यंदा 'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi 5) खूप गाजला आहे. या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण झाला आहे. बिग बॉसमुळे सूरजला खूप लोकप्रियता मिळाली आहे. अवघ्या महाराष्ट्र सूरजवर प्रेम करत आहे. लवकरच सूरजचा 'झापुक झुपूक' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दुसरीकडे सूरजच्या नवीन घराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. आपल्या गुलीगत स्टाइलने सूरज चव्हाणने सर्वांना आपल केले आहे.
आता काही काळातच सूरजचे ( Suraj Chavan) मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याचे घर लवकरच पूर्ण होणार आहे. गुलीगत सूरज घराला 'बिग बॉस' असे नाव देणार आहे. सूरजने आपल्या बंगल्याची पहिली झलक दाखवली आहे. सूरजने सोशल मिडियावर घराच्या बांधकामाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सूरज मजुरांसोबत स्वतः राबताना दिसत आहे.
सूरजने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये घराचा पाया बांधताना दिसत आहे. तसेच सूरज मजुरांसोबत स्वतः राबत आहे. भिंती बनवत आहे, सिमेंट काढत आहे. सूरज घरासाठी खूप कष्ट घेताना पाहायला मिळत आहे. सूरजने व्हिडीओला खूप हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "माझ घर...लवकरचं बिग बॉसचा बंगला" त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सूरज खूप कठीण परिस्थितीतून वर आला आहे. लहानपणीच त्याच्या डोक्यावरून आई-बाबांचे छत्र हरपले. त्याला लहानाचा मोठा त्याच्या बहिणींनी केले. सूरज बारामतीचा राहणार आहे. सूरजने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला घर बांधून देण्यार असल्याचा शब्द दिला होता. आता हा शब्द खरा होताना पाहायला मिळत आहे. सूरजच्या नवीन घराचे भूमिपूजन सोहळाही खूप थाटात पार पडला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.