बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आज आपला ३० वा वाढदिवस (Athiya Shetty Birthday) साजरा करत आहे. अथिया शेट्टी ही बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. अथिया शेट्टीने बॉलिवूड चित्रपटांमध्ये कामं केली पण तिला फार यश मिळाले नाही. बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी अनेक जण येतात पण यामध्ये प्रत्येक जण यशस्वी होतात असे नाही.
अनेक स्टार किड्स आहेत ज्यांना बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यात यश आले नाही. त्यातील एक नाव म्हणजे अथिया शेट्टी. अथिया शेट्टीने आपल्या ५ वर्षांच्या करिअरमध्ये बॉलिवूडला ४ चित्रपट दिले. पण वडील बॉलिवूडचे सुपरस्टार असताना देखील अथिया फ्लॉप ठरली आहे. तिचे चित्रपट चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळेच फक्त ५ वर्षांच्या करिअरनंतर आथियाने बॉलिवूडला रामराम केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अथिया शेट्टीने 2015 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. 'हिरो' या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. त्यावेळी तिच्या नावाची खूप चर्चा झाली कारण ती सुनील शेट्टीची मुलगी होती. ज्याने बॉलिवूडमध्ये आपले करिअर आधीच प्रस्थापित केले होते. अथियाचा हिरो चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. असे असताना देखील तिला इतर चित्रपटांच्या ऑफर्स आल्या.
2017 मध्ये 'मुबारकान', 2018 मध्ये 'नवाबजादे' आणि 2019 मध्ये तिने 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटांमध्ये काम केले. तिचे हे चित्रपट हिट ठरले नाहीत. हिरोप्रमाणे आथियाचे हे चित्रपट देखील फ्लॉप ठरले. त्यांना बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात यश आले नाही. त्यामुळे पाच वर्षांच्या कारकिर्दीत एकही हिट चित्रपट न देणाऱ्या अथियाने अभिनयाला अलविदा केला.
अथिया शेट्टीला बॉलिवूड चित्रपटांमध्ये आल्यानंतर चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे आजही सोशल मीडियावर तिच्या नावाची खूप चर्चा होते. आथिया शेट्टी सध्या चित्रपटामध्ये दिसत नसली तरी देखील ती सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के एल राहुलची लव्हस्टोरी खूपच चर्चेत राहिली. अथिया आणि केएल राहुलची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अथिया पहिल्यांदा राहुलला एका कॉमन फ्रेंडद्वारे भेटली होती. त्यानंतर दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत बोलणे सुरू केले. या दोघांचे नाते कोणापासूनही लपून राहिले नाही. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अथिया आणि केएल राहुलने यावर्षी लग्न केले. जानेवारी २०२३ मध्ये दोघांनी सुनील शेट्टीच्या फार्महाऊसमध्ये लग्न केले. या लग्नाला दोघांचे जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. अभिनय सोडल्यानंतरही अथिया तिच्या वडिलांच्या बिझनेसमध्ये मदत करते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.