
नवीन वर्ष लवकरच सुरु होणार आहे. नवीन वर्षात अनेक नियम बदलले जाणार आहे. ज्यामुळे तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. नवीन वर्षात UPI चेदेखील नियम बदलणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या डिजिटल वॉलेटवर परिणाम होणार आहे. रिझर्व्ह बँकेने UPI 123 Pay च्या ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये बदल केले आहेत. (UPI Rule Change)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. UPI 123Pay वापरणारे युजर्स आता ५००० ऐवजी १०,००० रुपयांचे ट्रान्झॅक्शन करु शकणार आहेत. याआधी फक्त ५००० रुपयांपर्यंत तुम्ही ट्रान्झॅक्शन करु शकत होता. हा नवीन नियम १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहे.
UPI 123Pay ही अशी सर्व्हिस आहे ज्यात तुम्ही विना इंटरनेटदेखील पेमेंट करु शकतात. हे ट्रान्झॅक्शन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कंट्रोल करते. परंतु आता या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
UPI 123Pay मध्ये युजर्स ४ पद्धतीने ट्रान्झॅक्शन करु शकतात. यात IVF नंबर, मिस्ड कॉल,OEM एम्बेडेड अॅप आणि साउंट बेस्ड टेक्नोलॉजीचा वापर करतात.यामध्ये युजर्स IVF नंबरद्वारे पेमेंट करु शकतील. यासाठी तुम्हाला (080-45163666, 0804516381, 6366200200) या नंबरवर कॉल करुन यूपीआय आयडी वेरिफाय करुन पेमेंट करावे लागेल.जवळपास ४ कोटी लोक या अॅपचा वापर करतात.
रिझर्व्ह बँकेने यूपीआय पेमेंट लिमिटबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यूपीआय पेमेंटची लिमिट डबल करण्यात आली आहे. त्यामुळे आता यूपीआय युजर्सला चांगला फायदा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.