EPFO Rule: नवीन वर्षात बदलणार EPFO चे नियम! PF ते पेन्शनच्या नियमांत होणार मोठा बदल

EPFO Rule Change From 1st January 2025: नवीन वर्षात ईपीएफओच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. पीएफचे पैसे आता तुम्हाला एटीएममधून काढता येणार आहे.
EPFO
EPFO Saam Tv
Published On

प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ खाते हे असते. या पीएफ खात्यात दर महिन्याला काही ठरावीक रक्कम जमा केली जाते. यातील काही रक्कम कर्मचाऱ्यांकडून तर काही रक्कम कंपनीकडून जमा केली जाते. पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम ही गुंतवणूक असते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओद्वारे हे खाते चालवले जाते. येत्या वर्षात ईपीएफओ काही नियम बदलणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार ते जाणून घेऊया.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी २०२५ मध्ये काही नियमांमध्ये बदल करणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगल्या सोयी-सुविधा मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे किंवा पेन्शनचे पैसे काढणे सोपे होणार आहे.येत्या वर्षात कोणत्या नियमांमध्ये बदल होणार ते जाणून घेऊया. (EPFO New Rule)

EPFO
EPFO Rules: EPFO चा नवीन नियम! आता हे कर्मचारी आधार कार्डशिवाय करु शकणार PF क्लेम; कसं? जाणून घ्या प्रोसेस

१. एटीएममधून काढता येणार पीएफचे पैसे (PF Withdraw From ATM)

आता तुम्हाला पीएफचे पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकतात. यासाठी तुम्हाला एक वेगळे एटीएम कार्ड देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

२. पीएफच्या मर्यादेत वाढ

आता तुम्ही पीएफच्या योगदान मर्यादेत वाढ करु शकतात. तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे पीएफमध्ये गुंतवू शकणार आहात.यामुळे कर्मचाऱ्यांची जास्तीत जास्त बचत होईल.

३. कोणत्याही बँकेतून काढता येणार पेन्शन

पेन्शन काढण्यासाठी काही नियम तयार करण्यात आले. त्यातील महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला फक्त तुमच्या रजिस्टर बँक खात्यातून पैसे काढता येतात. परंतु आता तुम्ही कोणत्याही बँकेच्या खात्यातून पेन्शन काढू शकणार आहात.

४. उच्च पेन्शनच्या तारखेबद्दल नियम

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पोर्टलवर सर्व कंपन्यांना ३१ जानेवारी २०२५ पर्यंत कर्मचाऱ्यांना पगाराची माहिती अपलेड करावी लागणार आहे. तसेच जास्त पेन्शन मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांना लवकर पेन्शन मिळावी, यासाठी नवीन नियम तयार केला जात आहे.

EPFO
Post office Scheme: पोस्ट ऑफिसची खास योजना! महिना ११५ रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा; काही महिन्यातच पैसे होतील डबल

4. इक्विटी लिमिट

दर महिन्याला पीएफमध्ये पैसे गुंतवले जातात. यावर तुम्हाला चांगले व्याजदर मिळते. या गुंतवणूकीपेक्षा एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे ईटीएफमधील गुंतवणूक फायद्याची ठरते. त्यामुळे ईटीएफ विकून लोक पैसे कमवतात. त्यामुळे पैशांचा काही भाग शेअर्समध्ये आणि इतर ठिकाणी गुंतवावे,त्यामुळे ईपीएफओ तुमच्या पैशावर अधिक व्याज मिळवू शकेल.

EPFO
Aadhar Card Update: आधार कार्डवरील पत्ता अपडेट करण्याची प्रोसेस आणखी सोपी;४५ पैकी एक कागदपत्र असेल तरी तुमचं काम होईल झटपट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com