चेतन व्यास, वर्धा
वर्ध्यात तीन दिवसीय महासांस्कृतिक महोत्सवाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं. महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला कैलाश खेर यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु या कार्यक्रमात अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
या कार्यक्रमात नागरिक पावसापासून बचावाकरिता तेथील खुर्च्या डोक्यावर घेऊन काही वेळ उभे राहिले. पण पावसाचा जोर वाढल्याने अनेकांनी खुर्चीसह घरचा रस्ता पकडला. या घटनेत नागरिकांनी एक दोन नव्हे तर एक हजारच्या जवळपास खुर्च्या फुर्रर्रर्र केल्याचं समोर आलं आहे. (Latest Marathi News)
कैलाश खेर यांचा कार्यक्रम असल्याने नागरिकांनी कार्यक्रम सुरु होण्याच्या एका तासांपूर्वी पासून गर्दी करायला सुरवात केली होती. हळूहळू मैदान भरू लागले, पण ठरलेल्या वेळेवर कार्यक्रम सुरु झाला नाही. अशातच काही वेळ पावसाच्या सरी बरसल्या पण वर्धेकरांनी धीर राखत तेथेच ठाण मांडून बसून राहिले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पावसाच्या सरी बंद होताच कार्यक्रम सुरु होईलच तर जनरेटरमध्ये बिघाड झाला तर काही वेळेत इलेक्ट्रिक वाद्यामध्ये सुद्धा बिघाड झाला. वर्धेकर नागरिक कार्यक्रम सुरु होण्याची वाट पाहत असताना वरूण राजाने पुन्हा आपली वाट मोकळी केली आणि मैदानात नागरिकांची तारांबळ उडाली.
नागरिकांनी बचावासाठी आपल्या डोक्यावर खुर्च्या घेत काहीनी दुचाकीवर तर काहींनी पायदळ आपल्या घरी खुर्च्या नेल्या. एवढंच नव्हे काहीनी खुर्च्याची मोडतोड केली तर काहींनी रस्त्यावर खुर्च्या फेकल्या.
डेकोरेशन मालक दिलीप भातकुलकर यांनी आवाहन करताना म्हटलं की,या कार्यक्रमासाठी बारा हजार खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. यापैकी एक हजाराच्या जवळपास खुर्च्या नागरिकांनी पळवून नेल्या. नागरिकांनी नेलेल्या खुर्च्या परत कराव्यात'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.