Wardha News : गारपिटीने नुकसानीच्या तक्रारीसंदर्भात तांत्रिक अडचण; प्रशासनाने ऑफलाईन सुविधा केली सुरु

Wardha News : वर्धा जिल्ह्याच्या देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू आणि आर्वी तालुक्यात या गारपीटीने शेतकऱ्यांचे कंबरड मोडलं आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी २८ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.
Wardha News
Wardha NewsSaam tv

चेतन व्यास 
वर्धा
: वर्धा जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या नुकसानीची तक्रार विमा कंपनीच्या (Crop Insurance Company) टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्यास शेतकऱ्यांना दोन दिवसांपासून तांत्रिक अडचण येत आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर (Wardha) जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी तातडीने पाऊल उचलत ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (Latest Marathi News)

Wardha News
Washim Accident : धावत्या ट्रकचा टायर निघाल्याने घडला अनर्थ; एकाचा मृत्यू, एक जखमी

वर्धा जिल्ह्याच्या देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू आणि आर्वी तालुक्यात या गारपीटीने शेतकऱ्यांचे कंबरड मोडलं आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी २८ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. या शेतकऱ्यांनी (Farmer) नुकसान झाल्याची ७२ तासाच्या आत नोंद करने बंधनकारक आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून शेतकऱ्यांना टोल फ्री क्रमांकवर तक्रार करण्यास अडचण येत होती. सोबतच विमा कंपनीच्या संकेतस्थळावरही तक्रार करण्यास अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Wardha News
Nandurbar Railway Station : अयोध्याकडे जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर दगडफेकीचा प्रकार; रेल्वे प्रशासनाकडून मात्र नकार

सदरची तांत्रीक (Crop Insurance) अडचणीची बाब लक्षात घेत आमदार रणजित कांबळे यांनी निदर्शनास आणून दिली होती. जिल्हा प्रशासनाने तालुका स्तरावर ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले. सोबतच विमा कंपनीच्या प्रतिनिधी, कृषी अधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनाही शेतकऱ्यांना मदतीच्या सूचना दिल्या आहे. आज प्रशासनाकडून विमा धारक शेतकऱ्यांच्या नुकसानीच तक्रार विमा कंपनीकडे करण्याचा प्रयत्न आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com