Wardha Accident : प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्स आणि एसटी बसचा भीषण अपघात; 4 लहान मुलांसह 16 प्रवासी जखमी

Wardha travels and bus accident : ट्रॅव्हल्समधील 16 प्रवासी जखमी झालेत. तर बसमधील चालकासह 4 प्रवासी जखमी असून यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये चार लहान मुलांचा देखील समावेश आहे.
Wardha travels and bus accident
Wardha AccidentSaam TV

चेतन व्यास, वर्धा

ट्रॅव्हल्स बसच्या अपघाताचं सत्र संपता-संपत नाहीये. केळझर येथे ट्रॅव्हल्स बस आणि एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅव्हल्स बसचा पूर्णत: चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Wardha travels and bus accident
Pune Car Accident: पुणे हिट अँड रन केस: शहरातील पब, हॉटेल, बारविरोधात पालिका प्रशासन आक्रमक; बेकायदा बांधकामांच्या तपासणीचे आदेश!

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अपघातात 20 प्रवासी जखमी आहे. तर तिघांची प्रकृती गंभीर आहे. केळझर येथील शहीद हरिभाऊ लाखे चौकात ही घटना घडली आहे. सेलू येथील बृहस्पती मंदिरातून आजनसरा येथे प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल जात होती. तर बस वर्धा येथून नागपूरला जातं होती.

यावेळी ट्रॅव्हल्स बस भरधाव वेगात होती. वेगात येणाऱ्या ट्रॅव्हल्सने एसटी बसला जोरात धडक दिली. अपघातात ट्रॅव्हल्समधील जखमी झालेल्या सर्व व्यक्ती टाकळघाट येथील असल्याची माहिती मिळालीये.

ट्रॅव्हल्समधील 16 प्रवासी जखमी झालेत. तर बसमधील चालकासह 4 प्रवासी जखमी असून यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये चार लहान मुलांचा देखील समावेश आहे. जखमींना सेलू, सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातामुळे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होता. अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करत अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Wardha travels and bus accident
Pune Accident : पुणे अपघात प्रकरणी काँग्रेस आक्रमक; तो VIDEO पोस्ट करत पोलिसांना विचारले ५ कळीचे प्रश्न

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com