Iran News: इराण राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, अपघात की इस्त्रायलकडून घातपात?

Iran Helicopter Crash: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झालाय. या अपघातामागे इस्त्रायलचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
इराण राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, अपघात की इस्त्रायकडून घातपात?
Iran President Ebrahim Raisi Helicopter CrashSaam Tv

तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झालाय. या अपघातामध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन आमीर अब्दुल्लाहियन यांचाही मृत्यू झालाय. इराण आणि अझरबैजानच्या सीमेवर बांधण्यात आलेल्या किज खलासी आणि खोदाफरिन या दोन धरणांच्या उदघाटनासाठी इब्राहिम रईसी अझरबैजानला गेले होते. त्यावेळी रईसी यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं.

या अपघातामागे इस्त्रायलचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय, तर अमेरिकेनं मात्र या शक्यता फेटाळल्यात. रईसींच्या अपघाती मृत्यूचा संबंध थेट इस्त्रायलशी का जोडला जातोय? हे जाणून घेऊ...

इराण राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, अपघात की इस्त्रायकडून घातपात?
Jayant Patil Letter: लढाई अद्याप संपलेली नाही, ५ व्या टप्प्यातील मतदान संपताच जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना भाविनक पत्र

अपघात की षडयंत्र?

* रईसींच्या ताफ्यात 3 हेलिकॉप्टर

* 2 हेलिकॉप्टर सुखरुप परतले

* रईसींचं हेलिकॉप्टर कोसळलं,त्यात रईसींचा मृत्यू

* इराण-इस्त्रायल संबंध चिघळलेले

* हमास-इस्त्रायल युद्धात इराणकडून इस्त्रायलवर मिसाईल हल्ले

* इराणचा हमासला जाहिर पाठिंबा

या कारणांमुळे सध्या सोशल मिडियावर या अपघातामागे इस्त्रायलच्या षडयंत्राच्या चर्चा रंगतायत.मात्र असं झाल्यास इराण-इस्त्रायल युद्ध भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इराण राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, अपघात की इस्त्रायकडून घातपात?
Ratnagiri News: रत्नागिरीत जगबुडी नदीत पाच जण बुडाले

भारत इराणच्या पाठीशी

रईसी यांच्या अपघाती मृत्यूमुळे भारतालाही मोठा धक्का बसलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रईसी यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. शोक व्यक्त करत पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, ''इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूची बातमी ऐकून धक्का बसला आहे. भारत-इराणचे संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम लक्षात राहील. त्यांचे कुटुंब आणि इराणच्या लोकांप्रती माझ्या सहवेदना आहेत.कठीण प्रसंगी भारत इराण सोबत पाठीशी आहे.''

जागतिक राजकारणाच्या दृष्टीनं भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा चाबहार बंदर करार रईसी यांच्याच कार्यकाळात झाला. अमेरिकेनं आक्षेप घेतल्यानंतरही भारतानं हा करार करण्याचं ठरवलं. इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतामधील खोल पाण्यात असलेल्या चाबहार बंदरात मोठी मालवाहू जहाजं सहजपणे ये-जा करु शकतात. त्यामुळे भारत, इराण, अफगाणिस्तान आणि युरेशिया एकमेकांशी जोडले जाणार आहेत. चीनच्या बेल्ट आणि रोड इनिशिएटीव्ह प्रकल्पाला चाबहार करार हे भारताचं उत्तर मानलं जातं.

इराणमध्ये त्यांचे सर्वोच्च नेतृत्वच देशाचं धोरण ठरवतं आणि त्यांचाच निर्णय अंतिम असतो. रईसींच्या अपघाती मृत्यूमुळे अनेक शंका उपस्थित होतायत. त्यातून इराण-इस्त्रायल युद्ध पेटणार का ? मिडल ईस्ट पुन्हा युद्धामुळे धुमसणार का ? आणि त्याचे जागतिक राजकारणावर कसे परिणाम होणार याची उत्तरं नवे अंतरिम अध्यक्ष मोहम्मद मोखबर यांना द्यावी लागतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com