Ratnagiri News: रत्नागिरीत जगबुडी नदीत पाच जण बुडाले

Jagbudi River News: खेड तालुक्यातील तुंबाड येथे जगबुडी नदीत पाच जण बुडाल्याची घटना घडली आहे. तुंबाड येथे पोहायला गेलेल्या पाच जणांपैकी दोघांचा यात बुडून मृत्यू झालाय. यातील तिघांना वाचविण्यात यश आलंय.
रत्नागिरीत जगबुडी नदीत पाच जण बुडाले
Jagbudi River NewsSaam Tv
Published On

अमोल कलये, साम टीव्ही, प्रतिनिधी

खेड तालुक्यातील तुंबाड येथे जगबुडी नदीत पाच जण बुडाल्याची घटना घडली आहे. तुंबाड येथे पोहायला गेलेल्या पाच जणांपैकी दोघांचा यात बुडून मृत्यू झालाय. यातील तिघांना वाचविण्यात यश आलंय.

सौरभ हरिश्चंद्र नाचरे ( वय - १९, पन्हाळजे ), अंकेश संतोष भागणे (वय -२०, बहिरवली- मधली वाडी) अशी दोघा मृतांची नावं आहेत. आज दूपारनंतर सौरभ, अंकेश, यांच्यासह अभय पांडुरंग भागणे, महेश मारुती गमरे, मयंक प्रकाश बाणाईत असे पाच जण तुंबाड इथल्या जगबुडी नदीपात्रात पोहायला गेले होते.

रत्नागिरीत जगबुडी नदीत पाच जण बुडाले
Maharashtra Politics: मुंबई, नाशिकमध्ये मविआ आणि भाजप कार्यकर्त्यांचा राडा; काँग्रेस कार्यकर्त्याने धमकावलं, BJP चा आरोप

यादरम्यान पाचही जणांनी नदीत पोहण्याच्या निमीत्ताने नदीमध्ये उड्या मारल्या. नेमक भरतीच्या दरम्यानची वेळ असल्याने या पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही.

तिथेच एका मासेमारी करणाऱ्या नावाड्याने तीघांना वाचवले. मात्र सौरभ आणि अंकेश हे भरतीच्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने ते बोटीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ते मृत्युमुखी पडले. स्थानिक ग्रामस्थांनी नंतर त्या दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. या घटनेची माहिती समजताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

रत्नागिरीत जगबुडी नदीत पाच जण बुडाले
Devendra Fadnavis: सर्वात आधी आम्हीच EC कडे तक्रार केली, उद्धव ठाकरेंचे नेहमीचेच रडगाणे: देवेंद्र फडणवीस

दरम्यान, मृत सौरभ हा वायरमन म्हणून काम करत होता. तर अंकेश भागणे मुंबई येथे एका बेकरीमध्ये कामाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पन्हाळजे - बहिरवली पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com