Devendra Fadnavis: सर्वात आधी आम्हीच EC कडे तक्रार केली, उद्धव ठाकरेंचे नेहमीचेच रडगाणे: देवेंद्र फडणवीस

Lok Sabha Election 2024: ''मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे'', असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठकारे यांच्यावर टीका केली आहे.
सर्वात आधी आम्हीच EC कडे तक्रार केली, उद्धव ठाकरेंचे नेहमीचेच रडगाणे: देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis on Uddhav ThackeraySaam tv

''मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे'', असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठकारे यांच्यावर टीका केली आहे.

उद्धव ठकारे यांनी आज पत्रकार परिषद घेत मतदान केंद्रावर दिरंगाई होत असून निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा सुरू, असल्याचा आरोप केला होता. यावेळी ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही गंभीर आरोप केले. यालाच आता देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

सर्वात आधी आम्हीच EC कडे तक्रार केली, उद्धव ठाकरेंचे नेहमीचेच रडगाणे: देवेंद्र फडणवीस
Uddhav Thackeray: पहाटे 5 वाजले तरी मतदान करा, रांगेतून हटू नका; उद्धव ठाकरे यांचं मतदारांना आवाहन

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी (उद्धव ठकारे) सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत.''

नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करत फडणवीस म्हणाले, ''माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका.''

सर्वात आधी आम्हीच EC कडे तक्रार केली, उद्धव ठाकरेंचे नेहमीचेच रडगाणे: देवेंद्र फडणवीस
PM Modi Interview: जुना इतिहास खोडून काढणार, दक्षिणेत PM मोदींना सर्वाधिक अपेक्षा; केलं मोठं वक्तव्य

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मोदी सरकारवर आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''मशिन बंद पाडले जातात. अधिकारी विलंब करतायेत. हा मोदी सरकारचा डाव आहे. ते पराभवाच्या भीतीने पछाडले आहेत. लोक उत्साहाने बाहेर पडले आहेत. त्यांना जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. हा निवडणूक आयोगाकडून खेळला जाणारा खेळ आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com