बदलत्या फॅशन ट्रेंडनुसार सध्या चांदीच्या दागिन्यांची डिमांड वाढली आहे. सोन्याचे दागिने परिधान करण्यापेक्षा अनेक महिला ऑक्सिडाइज टाइप चांदीच्या दागिन्यांना जास्त पसंती देतात. तर सोन्याकडे दागिन्यांऐवजी गुंतवणूकीचा पर्याय म्हणून पाहतात. अशात काल सोन्याचा भाव वाढला होता. मात्र आज पुन्हा एकदा सोन्यासह चांदीच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. चला तर मग जाणून घेऊ आजच्या नव्या किंमती.
आज सोन्याच्या किंमतींमध्ये १०० ग्राम मागे १०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आज २२ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ६,८५,४०० रुपये आहे. २४ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ७,४७,६०० रुपये आहे. तर १८ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ५,६०,८०० रुपये इतकी आहे.
प्रति तोळा २२ कॅरेट सोनं आज ६८,५४० रुपये आहे, २४ कॅरेट सोनं ७४,७६० रुपये प्रति तोळा आणि १८ कॅरेट सोनं ५६,०८० रुपये प्रति तोळ्याने विकलं जातंय. भाव कमी झाल्यानो गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी आहे.
मुंबईत १ ग्राम २२ कॅरेट सोनं ६,८९० रुपये, २४ कॅरेट सोनं ७,५१६ रुपये, १८ कॅरेट सोनं ५,६३७ रुपये प्रति १ ग्राम आहे. पुण्यातील १ ग्राम २२ कॅरेट सोन्याचे दर ६,८९० रुपये, २४ कॅरेट सोनं ७,५१६ रुपये आणि १८ कॅरेट सोनं ५,६३७ रुपये प्रति १ ग्राम आहे.
चेन्नईत आज २२ कॅरेट १ ग्राम सोनं ६,८४९ रुपये
नवी दिल्लीत २२ कॅरेट १ ग्राम सोनं ६,८५४ रुपये
कोलकत्तात २२ कॅरेट १ ग्राम सोनं ६,८९० रुपये
अहमदाबादमध्ये २२ कॅरेट १ ग्राम सोनं ६,८४४ रुपये
सकाळी जाहीर झालेल्या दरांनुसार आज चांदीच्या भावातही घसरण झाली. आज प्रति किलो चांदीची किंमत ९३,००० रुपये आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.