Pune Accident : पुणे अपघात प्रकरणी काँग्रेस आक्रमक; तो VIDEO पोस्ट करत पोलिसांना विचारले ५ कळीचे प्रश्न

Pune Hit and Run Case : पुण्यातील या अपघातावर विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. तसेच या प्रकरणाची न्यायिक चौकशी व्हावी, अशी मागणीही वडेट्टीवर यांनी केली आहे.
पुणे अपघात प्रकरणी काँग्रेस आक्रमक; तो VIDEO पोस्ट करत पोलिसांना विचारले ५ कळीचे प्रश्न
Pune Porsche Accident Case Shocking VIDEOSaam TV

पुण्यात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका अल्पवयीन मुलाने सुसाट कार चालवत दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. कल्याणीनगर भागात घडलेल्या या घटनेत एका तरुणासह, तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या हातात कार दिल्याप्रकरणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पुणे अपघात प्रकरणी काँग्रेस आक्रमक; तो VIDEO पोस्ट करत पोलिसांना विचारले ५ कळीचे प्रश्न
Pune Porsche Car Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवाल अखेर सापडला; पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून पकडलं

सोमवारी रात्री पोलिसांनी विशाल अग्रवाल यांना अटक देखील केली. हिट अँड रनच्या या घटनेमुळे पुणे शहरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पुण्यातील या अपघातावर विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. तसेच या प्रकरणाची न्यायिक चौकशी व्हावी, अशी मागणीही वडेट्टीवर यांनी केली आहे.

वडेट्टीवार यांनी आपल्या X अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की, पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारू पित असल्याचे सीसीटिव्ही फुटेज असूनही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली? रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली? नियम डावलून बार आणि पब सुरू होते का? होते तर त्यांच्यावर कारवाई का नाही? या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जणू पुणे पोलिसांचा तपास असल्याचे चित्र आहे, असे कळीचे प्रश्न वडेट्टीवार यांनी विचारले आहेत.

वडेट्टीवार यांनी आरोपी अल्पवयीन आहे हे माहीत असताना त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला? असा प्रश्न उपस्थित करत सदर घटनेची न्यायिक चौकशी व्हावी आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी, अशी मागणी देखील केली आहे.

पुणे अपघात प्रकरणी काँग्रेस आक्रमक; तो VIDEO पोस्ट करत पोलिसांना विचारले ५ कळीचे प्रश्न
Pune Hit and Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरणाचा आणखी एक व्हिडिओ आला समोर, संतप्त नागरिकांनी केली होती कारची तोडफोड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com