वर्ध्यात महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
मृत्यूनंतर संतप्त काही व्यक्तींनी डॉक्टरवर हल्ला केला
आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
वैद्यकीय संघटनेकडून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी
चेतन व्यास, वर्धा
वर्ध्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. यामुळे डॉक्टारावर हलर्गीपणाचा आरोप करत भाजपा पदाधिकारी व चार अज्ञात व्यक्तीने तळेगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण केली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारणातील आरोपींना तत्काळ अटक करा,अशी मागणी वैद्यकीय संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिस्तूर येथील रहिवासी लता मिसळे (वय ५२) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी सेवाग्राम येथील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करायाचे होते. यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता होले यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत रावेकर यांना फोन केला. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले की, सदर रूग्णवाहिका ही गरोदर महिलांसाठी आहे. त्यावर अंकिता होले यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले की फक्त पेशंट आर्वी पर्यंतच न्यायचा आहे तेथून आम्ही दुसरी रूग्णवाहिकेची व्यवस्था करू. त्यानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूग्णवाहिका चिस्तूर या गावी पाठविली. तेथून त्या रूग्णवाहिकेने सदर महिलेला आर्वी येथील रुग्णालयात नेले व व तेथून रूग्णवाहिका परत तळेगाव येथे आली.
दरम्यान, आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना काही वेळाने त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह चिस्तूर या गावी परत नेत असताना काही तळेगाव येथील भाजपचे पदाधिकारी व चार अज्ञात व्यक्ती परत तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येत डॉक्टरांवर संताप व्यक्त केला. यावेळी सचिन होले, अंकिता होले, नवाज खा पठाण, राहुल बुले तसेच इतर चार अज्ञातांनी ‘तुमच्या निष्काळजीपणामुळे त्या महिलेचा नाहक बळी गेला’ ती आता परत येणार नाही.असा आरोप करत वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत रावेकर यांना मारहाण केली. अशी तक्रार वैद्यकीय अधिकारी डाँ. संकेत रावेकर यांनी तळेगाव पोलिस ठाण्यात दिली.
घटनेच्या निषेधार्थ तालुकास्तरीय वैद्यकीय संघटनेच्या वतीने, तळेगाव पोलिस ठाण्यात निवेदन देत मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रात वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे आरोग्य यंत्रणा दहशतीत आली असून दरम्यान, या घटनेमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मारेकऱ्यांवर महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था प्रतिबंध अधिनियम २०१० अंतर्गत कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.