BJP Candidate List : भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र! ५ नव्या चेहऱ्यांना विधान परिषदेवर संधी, वाचा कुणाला मिळाली संधी? कुणाचा पत्ता कट?

Maharashtra Vidhan Parishad election 2026 : भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी देत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट करत पक्षाने धक्कातंत्राचा वापर केला आहे.
Vidhan Parishad Election 2026 BJP Candidate Name List
Vidhan Parishad Election 2026 BJP Candidate Name Listसाम टीव्ही मराठी
Published On

Vidhan Parishad Election 2026 BJP Candidate Name List : राज्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. उमेदवारांची निवड करताना भाजपकडून विभागीय समतोल साधण्यात आल्याचे दिसून येत आहे.विधान परिषदेसाठी भाजपने कुणाला संधी दिली? (BJP candidate list Maharashtra) कुणाचा पत्ता कट केल? याबाबत जाणून घेऊयात...

विधान परिषदेसाठी भाजपकडून कुणाला संधी?

विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. यामधील भाजपच्या वाट्याला ६ जागा येत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीतून भाजपने पाचही नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून येते. यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार, विवेक कोल्हे, संजय भेंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना संधी दिली आहे. काही दिवसांपूर्वी पज्ञा सातव यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजपने कुणाला दिला डच्चू?

विधान परिषदेच्या ९ जागा १३ मे २०२६ रोजी रिक्त होत आहेत. यामध्ये भाजपचे ४ आमदार आहेत. त्यामधील एकाही आमदाराला भाजपकडून पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर, रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपने पुन्हा संधी दिली नाही. त्यांच्या जागी भाजपकडून नव्या उमेदवारांवर विश्वास दाखवला आहे.

Vidhan Parishad Election 2026 BJP Candidate Name List
हिंदू तरूणीचे अपहरण, ५ दिवस घरात डांबून ठेवले; 'लव्ह जिहाद'ने अकोला हादरले

भाजपच्या यादीची वैशिष्ट्ये काय आहेत?

विधान परिषदेसाठी भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत विभागीय समतोल साधण्यात आल्याचे दिसून येत आहे. सुनील कर्जतकर यांच्या रूपाने मराठवाडा, प्रमोद जठार आणि माधवी नाईक यांच्या रूपाने कोकण, सुनील भेंडे यांच्या रूपाने विदर्भ तर विवेक कोल्हे यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला भाजपने प्रतिनिधित्व दिल्याचं दिसतेय. परंतु विभागीय संतुलनामध्ये मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राला संधी मिळाली नाही.

Vidhan Parishad Election 2026 BJP Candidate Name List
पानसरेंच्या पुस्तकावरून वाद, कार्यकर्त्यांची धरपकड; संजय गायकवाडांची मुजोरी कायम

विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम कसा ?

  • निवडणुकीची अधिसूचना जारी – २३ एप्रिल, २०२६ (गुरुवार)

  • उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस – ३० एप्रिल, २०२६ (गुरुवार)

  • उमेदवारी अर्जांची छाननी – २ मे, २०२६ (शनिवार)

  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – ४ मे, २०२६ (सोमवार)

  • मतदानाचा दिनांक – १२ मे, २०२६ (मंगळवार)

  • मतदानाची वेळ – सकाळी ०९:०० ते दुपारी ०४:०० पर्यंत

  • मतमोजणी (निकाल) – १२ मे, २०२६ (मंगळवार) सायंकाळी ०५:०० वाजता

  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक – १३ मे, २०२६ (बुधवार)

Vidhan Parishad Election 2026 BJP Candidate Name List
मराठी सक्तीवरून सरनाईकांचं नवं कोडं; १ मेपासून मराठी सक्ती, मात्र कारवाई नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com