हिंदू तरूणीचे अपहरण, ५ दिवस घरात डांबून ठेवले; 'लव्ह जिहाद'ने अकोला हादरले

Akola kidnapping case : अकोल्यात एका तरुणीचे अपहरण करून तिला ५ दिवस घरात ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Crime
CrimeSaam tv
Published On

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Akola kidnapping case woman held captive 5 days investigation : नाशिक आणि अमरावतीनंतर आता अकोला जिल्हा 'लव्ह जिहाद'च्या (Love Jihad) घटनेने हादरला आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका विवाहित मुस्लिम तरुणाने हिंदू तरुणीचे अपहरण केले आणि तिला पाच दिवस घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खदान पोलिसांनी या तरुणीची सुटका केली असून, या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad) कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी करत यामागे 'लव्ह जिहाद' असल्याचा आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्याचा 'जमीर जाहीरउद्दीन काझी' हा मुस्लिम युवक असून तो आधीच विवाहित आहे आणि त्याला एक मूलही आहे. तो 'गेमिंग ॲप'वर (Gaming App) 'बादशाह' या युजरनेमने बनावट अकाऊंट चालवतो. या माध्यमातून त्याची अनेक तरुणींशी ओळख आहे. त्यातील हरियाणा राज्यातील एका हिंदू तरुणीसोबत त्याने जवळीक साधली आणि प्रेमाच्या नावाखाली तिला अकोल्यात आणले. पुढे गीता नगर भागातील स्वतःच्या घरात तिला ५ दिवस ठेवले.

Crime
पानसरेंच्या पुस्तकावरून वाद, कार्यकर्त्यांची धरपकड; संजय गायकवाडांची मुजोरी कायम

दरम्यान, तिने घरी आई रागावल्याचे जमीरला सांगितले होते; त्यानंतर तिचा 'ब्रेन वॉश' (Brainwash) करून तिला स्वतःकडे यायला भाग पाडले, असा आरोप यावेळी करण्यात आला आहे. या प्रकरणात हरियाणा पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तिच्या शोधार्थ तरुणीचा भाऊ अकोल्यात आला आणि त्याने खदान पोलिसांशी संपर्क साधला असता हे सर्व बिंग फुटले. सध्या जमीर काझी हा पोलिसांच्या ताब्यात असून, आज दुपारपर्यंत त्याला हरियाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.या संपूर्ण घटनेला 'लव्ह जिहाद'ची किनार असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे. नेमके पाच दिवसांत तिच्यासोबत काय घडले, याचा सखोल तपास झाला पाहिजे, अशी मागणी हिंदू संघटनेने लावून धरली आहे.

Crime
मराठी सक्तीवरून सरनाईकांचं नवं कोडं; १ मेपासून मराठी सक्ती, मात्र कारवाई नाही

विश्व हिंदू परिषदेची मुख्य मागणी:-

गेल्या ५ दिवसांपासून तरुणीला घरात ठेवल्याची माहिती जमीरच्या आईला होती; मात्र त्यांनी चुप्पी का साधली? असा सवाल हिंदू संघटनेने केला आहे. तरुणीसोबत ५ दिवसांत काय घडले? हे सर्व होत असताना मुस्लिम युवकाचे कुटुंब शांत का होते? या कामासाठी जमीरला कोण फायनान्स (Finance) करत होते? यामागे कोणत्या संघटनांचा हात आहे? याचा सखोल तपास झाला पाहिजे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

Crime
नवरदेवाचा बूट लपवण्यावरून तुफान राडा; चाकूने सपासप वार, लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com