मराठी सक्तीवरून सरनाईकांचं नवं कोडं; १ मेपासून मराठी सक्ती, मात्र कारवाई नाही

Marathi Mandatory for Auto Drivers : महाराष्ट्रात १ मेपासून रिक्षाचालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय कायम ठेवण्यात आला असला तरी सध्या कारवाई होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या निर्णयावरून गोंधळ निर्माण झाला आहे.
Marathi Mandatory for Auto Drivers
Marathi Mandatory for Auto DriversSaam
Published On

रिक्षाचालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय जारी करत मुजोर परप्रांतीय रिक्षाचालकांना परिवहन विभागानं कारवाईचा इशारा दिला...मात्र आता याचं निर्णयात एक नवं कोडं निर्माण झालयं... 1 मे पासून मराठीसक्ती असेल. मात्र रिक्षाचालकांवर कारवाई होणार नाही.. त्यामुळे हा निर्णय नेमका काय आहे? अप्रत्यक्षरित्या सरनाईकांनी रिक्षाचालकांना कशी मुदतवाढ दिलीय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई अटळ

मुंबईसह राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. खंरतर, 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून परिवहन विभागानं मराठी सक्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर मुजोर रिक्षाचालकांनी संपाचं हत्यार उपसत सरकारच्या निर्णयालाच धुडकावून लावलं. अशातच सरकार आणि रिक्षा-टॅक्सी संघटनांमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालंय. आणि सरकारनं मराठी सक्तीचा निर्णय कायम ठेवत कारवाई होणार नसल्याचं स्पष्ट केलं....मंत्री प्रताप सरनाईकांनी मराठी सक्तीसंदर्भात काय माहिती दिली... पाहूयात...

1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत अमराठी रिक्षाचालकांना मराठी बोलता येते का? याची पाहणी केली जाणार... यासाठी सरकार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय.. तसंच, नियम भंग करणाऱ्यांवर बेकायदेशीर रिक्षाचालकांवर कारवाई करून त्याचं लायसन्स रद्द करण्यात येणार आहे. परिवहन विभागानं मिरा भाईंदरमधील 3443 रिक्षाचालकांचा सर्व्हे केला.. त्यात 565 अमराठी रिक्षाचालकांनी मराठी येत नाही मात्र शिकण्याची तयारी दाखवलीय..इतकंच नाहीतर अमराठी रिक्षाचालकांना RTO अधिकारी मराठी शिकवणार आहेत.

दरम्यान परिवहन विभागानं मराठी सक्ती कायम ठेवत... कारवाई करण्याचा निर्णय मागे घेतलाय...मात्र 1 मेपासून मराठीची मोहिम सुरुच राहणार आहे...

Marathi Mandatory for Auto Drivers
मराठी भाषेवरून लायसन्स रद्द होणार नाही; मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून भूमिका स्पष्ट

खरतर मोठा गाजावाजा करत परिवहन विभागानं मराठी सक्तीचा निर्णय लागू करण्यासंदर्भात परिपत्रक काढलं होतं..मात्र त्यानंतर रिक्षाचालकांनी मुजोरी कायम ठेवून संप पुकारल्यानंतर परिवहन विभागही काहीसा थंड झाला... त्यामुळे आता मराठी सक्ती कायम राहणार पण सद्यस्थितीत कारवाई मात्र करणार नसल्याचं सांगून परिवहन मंत्र्यांनी गोंधळ कायम ठेवलाय. त्यामुळे.आता 100 दिवसांनंतर मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर काय कारवाई होणार? अमराठी रिक्षाचालकांना मराठी बोलता यावी यासाठी अभ्यासवर्ग घेत असताना मराठी बोलण्यासाठी किती रिक्षाचालक या अभ्यासवर्गांना हजेरी लावणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे...मात्र आता लायसन्स जप्त होणार नसल्यान अमराठी रिक्षाचालक मराठी शिकणार का..हा प्रश्न अधांतरीच राहणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज

Marathi Mandatory for Auto Drivers
मराठीच्या मुद्द्यावर शिंदे गटात फूट, निरुपम मराठीद्वेष्ट्या भय्यांच्या पाठीशी, संतापलेल्या मनसैनिकांची निरुपमांच्या गाडीवर दगडफेक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com