Vidhan Parishad Election: राज्यभरात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; कुठे बिनविरोध, कुठे होणार लढत

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अनेक मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवडीची शक्यता निर्माण झाली आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election
Vidhan Parishad Election 2026: Where Contests Will Be Held And Which Seats Are Unopposedsaam tv
Published On
Summary
  • पुणे, ठाणे, रायगड, यवतमाळ आणि वर्धा येथे बिनविरोध निवडीची शक्यता

  • अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध विजयकुमार

  • 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे.

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या दिवशी अनेक घडामोडी उघडल्या. वर्धा,पुणे,ठाणे,रायगड आणि यवतमाळमध्ये बिनविरोध निवडणुका पार पडणार आहेत.

Maharashtra Vidhan Parishad Election
Maharashtra politics : पुणे, कोकणसह विधान परिषद निवडणूक बिनविरोध, सत्ताधाऱ्यांचा मविआला जोरदार झटका; पाहा कुठे काय झालं?

राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांसमोर महाविकास आघाडीनं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मविआच्या काही उमेदवारांनी संख्याबळाचं कारण, मित्रपक्षांचं सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत माघार घेतल्यानं अनेक ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

कुठे बिनविरोध , कुठे होणार लढत

पुणे -

स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून आज राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे, भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी माघार घेतली. तर, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यानं विक्रम काकडेंच्या बिनविरोध विजयाचा मार्ग सुकर झाला. दुसरीकडे पुण्यात राष्ट्रवादीचे विक्रम काकडे बिनविरोध विजयी झाले आहेत.

Maharashtra Vidhan Parishad Election
भाजप शिंदेसेनेचा बिस्मिला करणार, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा, भाजप शिंदेसेनेचा टप्प्या टप्प्यानं कार्यक्रम करणार?

अहिल्यानगर

अहिल्यानगरमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर करण ससाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तो देखील त्यांनी मागे घेतला आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज बाकी होता. शहाबाज सय्यद यांनी दत्तात्रय पानसरेंचा अर्ज मागे घेतला आहे. मात्र दत्तात्रय पानसरे यांनी अर्ज मागे घेतला नसल्याचं म्हटलंय.

ठाणे:

ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र फाटक उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजीत पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. पंरतु त्यांनी माघार घेतल्यानं रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले.

नाशिक

येथे शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपच्या गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागं घेतला. मात्र, गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला. यामुळं या ठिकाणी नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते अशी लढत होईल.

यवतमाळ :

यवतमाळ येथे काँग्रेसनं साहेबराव कांबळे यांना उमेदवारी दिली, होती मात्र त्यांनी काल माघार घेतली. दुसरीकडे सय्यद फारूख यांनीही अर्ज मागं घेतला. यामुळे या मतदारसंघातून दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी झालेत.

सांगली-सातारा :

शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांनी शंभराज देसाई यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेतला. या ठिकाणी धैर्यशील कदम आणि अभयसिंह जगताप अशी लढत होणार आहे.

नागपूर

नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार दिनेश ढोले, शेकापचे अपक्ष उमेदवार सुरेंद्र लोही, राजेंद्र जंगले यांनी उमेदवारी अर्ज मागं घेतला आहे. या ठिकाणी अतुल लोंढे यांच्या विरोधात महायुतीचे डॉ. राजीव पोतदार अशी लढत होईल.

सोलापूर

सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीतून आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांनी माघार घेतली. सोलापूर विधानपरिषदेत भाजपचे राजेंद्र राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख या दोघांचेच अर्ज कायम आहे.

नांदेड

महायुतीला नांदेड येथील बंड शमवण्यात यश आलं. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनी माघार घेतली. याठिकाणी काँग्रेसचे रामदास पाटील विरुद्ध भाजप महायुतीचे अमर राजूरकर अशी लढत होईल.

भंडारा-गोंदिया

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांची उमेदवारी कायम आहे. येथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप बनसोड यांच्यासह काँग्रेसचे बंडखोर प्रफुल अग्रवाल यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली :

या मतदारसंघातून भाजप उमेदवार अरुण लखानी बिनविरोध विजयी झाले आहेत. काँग्रेस उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल आणि अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आहे.

अमरावती :

अमरावती स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात भाजपचे प्रवीण पोटे पाटील, काँग्रेसचे हर्षजीत देशमुख आणि वंचितचे निलेश विश्वकर्मा आमने-सामने असणार आहेत.

परभणी हिंगोली :

परभणीत शिंदे सेनेचे सईद खान, उबाठा सेनेचे डॉ. विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसच्या सुशील देशमुख यांचा अर्ज या ठिकाणी कायम राहिला. तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.

धाराशिव-लातूर-बीड :

महायुतीकडून भाजपचे बसवराज पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे महेश देशमुख निवडणूक आखाड्यात आहेत. धाराशिव लातूर बीड विधान परिषदेतील सर्व सात अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत.

जळगाव :

जळगाव विधान परिषदेसाठी आतापर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार आसिफ मोहम्मद, सुनील जंगले, प्रवीण पाटील या उमेदवारांनी माघार घेतली. तसेच अपक्ष उमेदवार कलीम मणियार, उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख निलेश चौधरी यांनी माघार घेतली.

शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार दीपक धांडे, यांनी माघार घेतली आहे. शिंदेच्या सेनेच्या रेश्मा काळे यांनी माघार घेतलेली नाहीये.भाजपकडून नंदकिशोर महाजन आणि ठाकरेंच्या सेनेकडून शरद तायडे रिंगणात आहेत.

छत्रपती संभाजीनगर-जालना :

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे सुहास शिरसाट आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून गणेश लोखंडे आमने सामने आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनं ज्यांना उमेदवारी दिलेली त्या देवयानी डोणगावकर यांनी अर्ज मागे घेतला आहे. समीर सत्तार यांनीदेखील माघार घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com