भाजप शिंदेसेनेचा बिस्मिला करणार, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा, भाजप शिंदेसेनेचा टप्प्या टप्प्यानं कार्यक्रम करणार?

Abdul Sattar Claims Bjp Targeting ShindeSena Mahayuti Rift: विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून महायुतीत चांगलीच धुसफूस पाहायला मिळाली... अशातच शिंदेसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय... सत्तार नेमकं काय म्हणाले? शिदेसेनेतील बंडखोरांनी कशी माघार घेतलीय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Abdul Sattar’s remarks alleging BJP’s strategy against Shinde Sena trigger fresh tensions within Mahayuti ahead of council elections.
Abdul Sattar’s remarks alleging BJP’s strategy against Shinde Sena trigger fresh tensions within Mahayuti ahead of council elections.saam tv
Published On

ऐकलीत सत्तारांची ही विधानं? शिंदेसेना आणि भाजपमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचेच हे संकेत आहेत....विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आणि बंडखोरी आता चव्हाट्यावर आलीय.. महायुतीत तब्बल 6 जागांवर मित्रपक्षांच्या बंडखोरांनी अधिकृत उमेदवाराविरोधात शड्डू ठोकला... छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांच्या मुलानं बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं चांगलाच वाद पेटला...त्यात शिंदेसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं विधान सत्तारांनी केल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच याप्रकरणात लक्ष घालावं लागलंय... मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'नंदनवन' या ठाण्यातील निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीनंतर महायुतीमधील छत्रपती संभाजीनगर आणि रायगडचा तिढा अखेर सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली.... सत्तार यांचा मुलगा समीर हे माघार घेणार असल्याचं जवळपास निश्चित असतानाच अचानक अब्दुल सत्तार समोर आले आणि शिवसेनेला टप्प्याटप्प्याने संपवण्याचे काम भाजपकडून सुरू असल्याचा आणखी एक खळबळजनक आरोप केला. त्यामुळे पुन्हा माघारीवरून संभ्रम निर्माण झालाय. तर सत्तारांच्या समर्थनात आता शिंदेसेनेचे इतर आमदारही उघडपणे पुढे आले आहेत.

तर दुसरीकडे भाजपचे मंत्री गिरीश महाजनांनी सत्तारांच्या या विधानाचा समाचार घेतलाय. त्यामुळे तिढा सुटण्याऐवजी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिंदेसेनेच्या बंडखोरांना कशी माघार घ्यावी लागलीय... पाहूयात...अमरावती विधानपरिषदेतील शिंदेसेनेचे बंडखोर उमेदवार बिप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झालाय... तर महेंद्र दळवींची मुलगी जुईली दळवीनं रायगड विधानपरिषदेच्या निवडणुकीतून माघार घेतलीय...

एकनाथ शिंदेंच्या डॅमेज कंट्रोलमुळे तूर्तास महायुतीसमोरील बंडखोरीचे संकट टळले असले, तरी अब्दुल सत्तारांनी उघडपणे व्यक्त केलेली नाराजी बरेच काही सांगून जाणारी आहे. वरिष्ठांच्या निर्देशानुसार जागांचा तिढा सुटला असला, तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदेसेनेतील 'मायनस'मध्ये गेलेलं समन्वय निवडणुकीत मित्रपक्षाला फायदेशीर ठरणार की अंतर्गत सुंदोपसुंदीमुळे महायुतीला फटका बसणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com