विदर्भ भाजतोय! अकोला-वर्ध्यात तापमान ४५° पार, उष्णतेचा कहर

Vidarbha Heatwave Temperature Crosses 45 Degrees News: विदर्भात उष्णतेची लाट तीव्र झाली असून अकोला आणि वर्धा येथे तापमान ४५ अंशांवर पोहोचले आहे. नागपूरसह अनेक शहरांमध्ये उकाड्याने जनजीवन विस्कळीत झाले असून हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी हीटवेव्हचा इशारा दिला आहे.
People struggle under extreme heat as temperatures soar above 45°C in Vidarbha region.
People struggle under extreme heat as temperatures soar above 45°C in Vidarbha region.saam tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपुर: एप्रिल महिन्याच्या मध्यातच विदर्भाने अक्षरशः आगीच्या वाफांचा अनुभव घ्यायला सुरुवात केली आहे. संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट (Heatwave) तीव्र झाली असून, आज अकोला आणि वर्धा या दोन शहरांनी तापमानाचा ४५ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या उष्म्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना दुपारच्या वेळी घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

People struggle under extreme heat as temperatures soar above 45°C in Vidarbha region.
Ashok Chavan Nagpur News | तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रात सरकार येऊ शकतं, चव्हाण यांचा विश्वास

अकोला आणि वर्ध्यात उच्चांकी तापमान

आज अकोला आणि वर्धा येथे सर्वाधिक ४५.०°C तापमानाची नोंद झाली. अकोल्यात सरासरी तापमानात १.७ अंशांनी वाढ झाली असून उष्णलाटेची स्थिती अधिक भीषण झाली आहे. बुलढाण्यातही तापमानात १.८ अंशांची वाढ होऊन पारा ४१.२ अंशांवर पोहोचला आहे.

People struggle under extreme heat as temperatures soar above 45°C in Vidarbha region.
Maharashtra Weather: मुंबईसह राज्यात पाऊस कोसळणार, वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

नागपूरसह इतर शहरांची स्थिती

विदर्भाची उपराजधानी असलेल्या नागपुरातही उन्हाचा तडाखा कमी नाही. नागपुरात आज ४४.४°C तापमानाची नोंद झाली. अमरावती येथे ४४.२ अंश, तर गोंदियामध्ये ४३.५ अंशांपर्यंत पारा चढला होता.

इतर शहरांतील तापमानाची आकडेवारी:

ब्रह्मपुरी: ४३.२°C

गडचिरोली: ४३.२°C

भंडारा: ४३.०°C

चंद्रपूर: ४२.४°C

People struggle under extreme heat as temperatures soar above 45°C in Vidarbha region.
राजकीय वाद पुन्हा उफाळला; अकोल्यात काँग्रेस-एमआयएम नगरसेवकांमध्ये राडा, चाकू हल्ला अन् हाणामारी

हवामान विभागाचा इशारा

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, विदर्भात पुढील काही दिवस तापमानाचा हा तडाखा कायम राहण्याची शक्यता आहे. तापमान ४५ अंशांच्या आसपासच राहण्याचा अंदाज असल्याने 'हीट वेव्ह'चा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. वाढत्या उष्म्यामुळे डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे आणि डोक्याला रुमाल किंवा टोपीचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com