राजकीय वाद पुन्हा उफाळला; अकोल्यात काँग्रेस-एमआयएम नगरसेवकांमध्ये राडा, चाकू हल्ला अन् हाणामारी

Akola political clash : अकोल्यात काँग्रेस आणि एमआयएम नगरसेवकांमध्ये झालेल्या वादातून हिंसाचार उसळला. चाकू हल्ल्यात ५ जण जखमी झाले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
Congress news
congrerssSaam tv
Published On

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Akola Congress AIMIM corporators clash knife attack details : अकोल्यातील अकोट फैल भागात काँग्रेस आणि एमआयएमचे नगरसेवकांमध्ये राडा झालाय. या दरम्यान, दोन्ही पक्षाचे नगरसेवकांचे समर्थक देखील एकमेकांवर भिडले होते. यानंतर झालेल्या राड्यादरम्यान एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करण्यात आलाये. तो गंभीर जखमी असून अन्य चार जण यात जखमी झाले. त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

अकोला महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होताच काँग्रेस आणि एमआयएम या दोन्ही पक्षांचे नगरसेवक आणि समर्थक यांच्यातील तणाव सातत्याने वाढतचं आहेये. काल रात्रीही अकोट फैल भागात एमआयएमचे नगरसेवक सय्यद रहीम सय्यद हाशम आणि काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल करीम यांच्यातील शाब्दिक वादाचे रूपांतर अल्पावधीतच झटापटी, हाणामारी आणि दगडफेकीत झाले. या गोंधळादरम्यान, एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला झालाय. या घटनेत आणखी एकत्रित 5 जणही जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

Congress news
२ भावांसोबत नवऱ्याचा बायकोवर बलात्कार, नको तसले व्हिडिओही काढले अन्...

एमआयएमचे नगरसेवक आणि काँग्रेसचे नगरसेवक तसेच त्यांचे समर्थकांमध्ये हा संपूर्ण राडा झाला होता. महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून सुरू असलेली अंतर्गत राजकीय धुसफूस हेच या वादाच प्रमुख कारण असल्याचे समजतं आहे. या घटनेनंतर, परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे.

Congress news
Nashik Accident : नाशिक-पुणे महामार्गावर वृद्ध चालकाच्या कारचा थरार; तरुणीचा जागीच मृत्यू, ४ जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com