Samruddhi Expressway Accident : रील बनवण्याच्या नादात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, २५ जखमी

Samruddhi Expressway latest accident news : समृद्धी महामार्गावर चालक रील बनवण्यात गुंतल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.
Samruddhi Expressway Accident
Samruddhi Expressway AccidentSaam TV Marathi
Published On

संजय जाधव | बुलढाणा प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

Samruddhi Expressway bus accident reel video cause details : समृद्धी महामार्गावर चालकाचा निष्काळजीपणा आणि रील बनवण्याच्या नादामुळे एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी ६ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. आज सकाळी सहा वाजताच्या आसपास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. चालक आणि वाहक रील बनवण्यात मग्न होते, त्यामुळेच हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे.https://youtu.be/ZOmRT8VQqO8

नेमकी घटना काय?

मुंबईहून पुसदकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्स आज सकाळी ६ च्या सुमारास मेहकर टोल नाक्याजवळ आली असता हा अपघात घडला. बसमधील प्रवाशांच्या माहितीनुसार, चालक आणि वाहक मोबाईलवर रील बनवण्यात मग्न होते, ज्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. ही बस दुसऱ्या एका कारवर जाऊन आदळली, ज्यामध्ये कारचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ मदतकार्य करून त्यांनी जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Samruddhi Expressway Accident
आणखी एका युद्धाचा भडका? उत्तर कोरियानं डागल्या एकापाठोपाठ एक मिसाईल, २ देश अलर्ट; पंतप्रधान म्हणाले...

रुग्णालयात डॉक्टरांची अनुपस्थिती; नातेवाईकांचा संताप

अपघातानंतर जखमींना तात्काळ मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात सुमारे एक तास एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याने वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. सध्या गंभीर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Samruddhi Expressway Accident
Akshaya Tritiya : फक्त १ रूपयांत खरेदी करा २४ कॅरेट गोल्ड, घरबसल्या Paytm, PhonePe आणि Jio Finance वर असे करा बुकिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com