Vegetables Price Hike: नंदुरबार बाजारात भाज्यांचे दर गगनाला भिडले; कांदा, बटाटा, टोमॅटोसह कोथिंबिरही महागली

vegetables price hike in nandurbar : सध्या गृहिणींची लोणचे बनवायची लगबग घरोघरी सुरू आहे. त्यासाठी गावरान कैरीची मागणी आहे. परंतु पावसाळा सुरु झाल्याने आवक कमी असल्याने गृहिणींना कैरी जादा दराने विकत घ्यावी लागत आहे.
vegetables price hike in nandurbar
vegetables price hike in nandurbarSaam Digital

- सागर निकवाडे

नंदुरबार जिल्ह्यात पावसाळा लांबल्याने तसेच यावर्षी अधिक तापमानामुळे भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरातील भाजीपाला मार्केट मध्ये आवक घटल्याने फळ आणि पालेभाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी सर्व भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. नंदुरबारमध्ये भाज्यांचे प्रतिकिलो दर शंभर रुपयांपासून वाढले आहेत.

vegetables price hike in nandurbar
Saam Impact : शाळेच्या व्हरांड्यात बसून धडे गिरवणा-या विद्यार्थ्याला शिक्षणाची कवाडे खूली, 'साम टीव्ही' मुळेच झाले शक्य आरे ग्रामस्थांची भावना

शहरातील बाजारात कांदा, बटाटा, टोमॅटोसह कोथिंबिरीच्या दरात देखील वाढ झाल्याचे चित्र आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत उष्ण वातावरणामुळे पाण्याची उणीव भासत असल्याने शेतकरी भाजीपाल्याची लागवड फारशी करत नाहीत.

vegetables price hike in nandurbar
Nashik City Bus Service : नाशिक सिटी लिंक बस सेवा ठप्प, प्रवाशांचे हाल; कर्मचा-यांनी पगार थकल्याने पुकारला संप

पुरेशा उत्पादनाअभावी बाजारात भाज्यांचा तुटवडा जाणवतो आणि मालाला जादा भाव मिळतो. परिणामी भाज्यांची आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे. पावसामुळे आवक घटल्याने कांदा, मिरची आणि बटाटा, लसूण, अद्रक, फूलकोबी सर्वच भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

vegetables price hike in nandurbar
PSI Success Story : वडिलांचे कष्ट पाहून 'खुशबू' झाली व्यथित... मार्ग दिसला अन् 'बरैय्या' बनली फाैजदार (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com