Nashik City Bus Service : नाशिक सिटी लिंक बस सेवा ठप्प, प्रवाशांचे हाल; कर्मचा-यांनी पगार थकल्याने पुकारला संप

300 employees strike interrupts nashik city link bus service today: Nashik City Bus Service : नाशिक सिटी लिंक बस सेवेचे कर्मचारी सातत्याने संपाचे हत्यार उपसतात. यामुळे प्रवाशांची अडचण हाेते.
300 employees strike interrupts nashik city link bus service today
300 employees strike interrupts nashik city link bus service todaySaam Tv

पगार थकल्याने नाशिक शहरातील सिटी लिंक बस सेवेच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून (शुक्रवार) पुन्हा आंदोलन छेडले. परिणामी सिटी लिंक बस सेवेचे वेळापत्रक काेलमडले आहे. दरम्यान - नाशिक रोड डेपो मधील बस सेवा सुरळीत सुरु आहे.

नाशिक सिटी लिंक बस सेवा पूरविणा-या कर्मचा-यांचा गेल्या दाेन महिन्यांपासून पगार झालेला नाही. यामुळे सुमारे 300 कर्मचा-यांनी आज अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतला. यामुळे आज सकाळपासून तपोवन डेपोतील शहर बस वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.

300 employees strike interrupts nashik city link bus service today
MSP ची वाढ तुटपुंजी, केंद्र सरकराने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं : डाॅ. अजित नवले

दरम्यान बस वाहकांच्या पगारातून दंडाची रक्कम वसूल केल्याने कर्मचारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळपासून सिटी लिंकच्या 200 ते 250 बस तपोवन डेपोतचं उभ्या आहेत. नाशिक रोड डेपो मधील बस सेवा सुरळीत असल्याची माहिती समाेर आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

300 employees strike interrupts nashik city link bus service today
Amravati News : झोपडपट्टी परिसरातील अनिरुद्धची शिक्षणाची आस, ब्रिटिश सरकारची दीड कोटीची फेलोशिप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com