Amravati News : झोपडपट्टी परिसरातील अनिरुद्धची शिक्षणाची आस, ब्रिटिश सरकारची दीड कोटीची फेलोशिप

अनिरुद्ध याने परदेशी जाणा-या मुलांना मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा त्याच्या पालकांनी व्यक्त केली.
aniruddha mahajan, university of edinburgh
aniruddha mahajan, university of edinburghsaam tv
Published On

- अमर घटारे

Aniruddha Mahajan News : जिद्द चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे अमरावतीच्या अनिरुद्ध महाजन (aniruddha mahajan) याने सिद्ध करुन दाखविले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अनिरुद्ध याने UK मधील युनिव्हर्सिटी ऑफ एडीनबर्ग (university of edinburgh) येथे पीएचडीसाठी प्रवेश मिळवला आहे. विशेष म्हणजे त्याला तीन वर्षासाठी दीड कोटी रुपयांची स्कॉलरशिप देखील मिळाली आहे. (Maharashtra News)

aniruddha mahajan, university of edinburgh
Flood Hits Gadchiroli : पावसाचा हाहाकार... दक्षिण गडचिरोली चंद्रपूरचा संपर्क तुटला

अमरावती येथील झोपडपट्टी परिसर समजल्या जाणाऱ्या फ्रेझरपुरा परिसरातील ऑटो चालक साहेबराव व एसटी महामंडळात (msrtc) वाहक असलेल्या लतिका महाजन यांचा अनिरुद्ध हा मुलगा आहे. झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या अनिरुद्धच्या यशाने त्याचे पालकांना (parents) खूप आनंद झाला आहे.

aniruddha mahajan, university of edinburgh
Rasta Roko Andolan : वीज वितरण कंपनीवर ग्रामस्थांचा राेष, कळंब-लातुर महामार्गावरील लोहटा पुर्व गावात छेडलं रास्ता रोको आंदोलन

अनिरुद्धने यापूर्वी इन्स्टिट्युट ऑफ टाटा सोशल सायन्स मुंबईवरून MSW तसेच मास्टरइन पब्लिक पॉलिसी या विषयात आयआयटी मुंबईतून सुद्धा डिग्री घेतली. त्याला एडीनबर्ग विद्यापीठात पीएचडी करायचे होते मात्र दीड कोटी रुपये खर्च हा कुटुंबाला झेपत नसल्याने त्याने विद्यापीठातील काही स्कॉलरशिप देणाऱ्या संस्थेसोबत संपर्क केला.

aniruddha mahajan, university of edinburgh
PSI Success Story: शेतमजुर मुलगा पीएसआय हाेताच आई-वडिलांना आनंदाश्रू अनावर...

अनिरुद्धची जिद्द, गुणवत्ता व शिक्षणाची तळमळ पाहून त्याला तीन वर्षासाठी दीड कोटीची शिष्यवृत्ती मंजूर झाली. लवकरच अनिरुद्ध हा पीएचडीसाठी एडीनबर्ग विद्यापीठात दाखल होणार आहे.

देशाचे पहिले कृषीमंत्री अमरावती निवासी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्यानंतर एडीनबर्ग विद्यापीठात १०१ वर्षानंतर पीएचडीसाठी जाणारा अनिरुद्ध हा दुसराच विद्यार्थी होय. यासाठी आपण गेल्या चार वर्षापासून प्रयत्न करत असल्याचे अनिरुद्ध महाजन याने साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

aniruddha mahajan, university of edinburgh
Nagar News : महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ : भाजपच्या माजी मंत्र्यांचा पोलिसांना इशारा

दरम्यान अगदी जेमतेम आर्थिक परिस्थिती असल्याने आम्हांला अनिरुद्धसाठी दीड कोटीचा खर्च करणे शक्य नव्हते. मात्र अनिरुद्धने त्याच्या कर्तुत्वाने एडीनबर्ग विद्यापीठाची स्कॉलरशिप मंजूर करून घेतली. त्यामुळे आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. त्याने आपल्या देशातून परदेशी शिक्षणासाठी जाणा-या इतर विद्यार्थी आहेत त्यांना देखील मार्गदर्शन व मदत करावी अशी अपेक्षा वडील साहेबराव आणि आई लतिका महाजन यांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com