Nagar News : महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ : भाजपच्या माजी मंत्र्यांचा पोलिसांना इशारा

वारंवार छेडछाडीच्या घटना घडू लागल्याने नागरिक संतप्त झालेत.
shivaji kardile, nagar news
shivaji kardile, nagar newssaam tv
Published On

- सुशील थोरात

Nagar News : मुलींच्या होणाऱ्या छेडछाड प्रकरणात पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घालावे अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले (shivaji kardile) यांनी दिला आहे. कर्डिलेंनी बाेलाविलेल्या बैठकीस ग्रामस्थांनी माेठ्या संख्येने उपस्थिती लावली हाेती. (Maharashtra News)

shivaji kardile, nagar news
Shri Vitthal Rukimini Mandir : भाविकांनाे ! पंढरीच्या विठुरायाची पाद्यपूजा, तुळशी पूजा बंद; जाणून घ्या कारण

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शहरात असणार्‍या शाळा, कॉलेज, खासगी क्लासेससाठी येणार्‍या मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्याने भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी स्थानिक नागरिकांसह पोलीस (police) प्रशासनासोबत बैठक घेतली. या बैठकीत कर्डीलेंनी पाेलिसांना कायदा व सुव्यवस्थेचा माेठा प्रश्न निर्माण झाल्याचे विविध दाखले दिले.

shivaji kardile, nagar news
Hingoli Crime News : आर्थिक घाेटाळ्याप्रकरणी बुलढाणा अर्बनच्या शाखा व्यवस्थापकांसह 5 कर्मचा-यांवर कळमनुरीत गुन्हा दाखल

छेडछाडीचा व्हिडिओ व्हायरल

2 जुलैला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका शालेय विद्यार्थीनीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला होता. याची दखल घेऊन राज्य महिला आयोगाने पोलीस प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश दिले होते.

shivaji kardile, nagar news
Flood Hits Gadchiroli : पावसाचा हाहाकार... दक्षिण गडचिरोली चंद्रपूरचा संपर्क तुटला

अन्यथा कायदा हातात घेऊ

ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा थेट शाळेत येऊन एका युवकाने मुलींची छेड काढल्याचा प्रकार घडल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. दरम्यान अशा घटनांना आवर घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पाऊल उचलावीत अन्यथा आम्हांला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी पाेलिस दलास आज दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com