उद्धव ठाकरे पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होणार! बड्या नेत्याच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पुढील वर्षी उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा केला आहे. तसेच शिंदे गटातील काही नेते पुन्हा ठाकरे गटात परततील, असेही त्यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics
Uddhav Thackeray To Become Maharashtra Cm Next Year? Chandrakant Khaire’s Big Claimsaam tv
Published On
Summary
  • पुढील वर्षी उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.

  • शिंदे गटात गेलेले काही नेते पुन्हा ठाकरे गटात परततील, असेही खैरे म्हणाले.

  • सरकारमधील अंतर्गत मतभेदांमुळे शिंदे गटातील नेते ठाकरे गटाकडे परतू शकतात, असा दावा करण्यात आला.

पुढच्या वर्षी राजकारणात मोठी घडामोड होणार आहे. राज्याचा मुख्यमंत्री बदलणार असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या नेत्यानं केलाय. पुढील वर्षी उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील, यासह शिंदे गटात गेलेले नेतेही पुन्हा ठाकरे गटातील परत येतील, असा दावा ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय.

Maharashtra Politics
राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालीय. पुढाऱ्यांपासून ते सामन्य लोकांच्या घरी गणरायाचे आगमन झालंय. राजकीय नेत्यांच्या घरातही गजराज विराजमान झालेत. ठाकरे गटाचे माजी खाजदार चंद्रकांत खैरे यांच्या घरीही गणरायाचे आगमन झाले. गणरायाची पूजा केल्यानंतर खैरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा केलाय.

Maharashtra Politics
मोठी बातमी! आता बंडखोर खासदारांच्या गटातच फूट? 17 जणांनी निवडला वेगळा मार्ग

पुढील वर्षी उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होतील आणि शिंदे गटात गेलेले नेतेही परत ठाकरे गटात येतील असा दावा केलाय. त्यांच्या या दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान खैरे हे माध्यमांशी संवाद साधत होते, त्यावेळी त्यांच्यासोबत शिंदे गटातील पदाधिकारीही उपस्थित होता. यावेळी खैरे यांनी सरकारमधील अंतर्गत वादाचा उल्लेख केला. सरकारामधील वादामुळे शिंदे गटातील नेते पुन्हा ठाकरे गटात येतील असा दावा त्यांनी केलाय.

मुंबई महापालिका आणि ठाण्यात भाजप आणि शिंदे सेनेत वाद सुरू झालाय. मुंबई महानगरपालिकेत सुधार समितीच्या सभेतून भाजप आणि शिंदे गट नेत्यांमध्ये राडा झाला होता. काही तासांनंतर स्थायी समितीच्या सभेतून वडाळा झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रकरणी शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी सभात्याग केला होता. भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Maharashtra Politics
पक्ष बदलणाऱ्या खासदार- आमदारांना चाप बसणार; पक्षांतर रोखण्यासाठी कपिल सिब्बलांनी सुचवला 'मास्टरप्लॅन'

विधानसभा निवडणुकीत भाजपने १३२ जागांसह वर्चस्व मिळवल्याने महायुतीतील समीकरणे बदललीत. याचा एकनाथ शिंदे यांच्या राजकीय ताकदीवर त्याचा परिणाम झाल्याचे मानले जातंय. निधी वाटप, विधान परिषद निवडणूक आणि दिल्लीतील राजकीय संपर्कापर्यंत अनेक मुद्द्यांवरून दोन्ही पक्षांत धुसफूस वाढली होती. दुसरीकडे ठाण्यात गणेश नाईक यांनी शिंदेंविरोधातच मोहीम उघडलीय. मीरा-भाईंदरमध्ये मेहता आणि प्रताप सरनाईकांमध्ये संघर्ष सुरू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com