राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maval’s Veteran Political Leader Madan Bafna Dies at Age 85: महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी महसूल व परिवहन राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी आजारपणामुळे निधन झाले आहे.
Former Maharashtra Revenue Minister Madan Bafna dies
Former Maharashtra Revenue Minister Madan Bafna diessaam tv
Published On

मावळच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ नेतृत्व, माजी मंत्री मदन बाफना यांचे दीर्घ आजारपणामुळे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ॲड. मदन बाफना यांची राजकीय कारकीर्द अत्यंत प्रदीर्घ आणि प्रभावी राहिली होती.

Former Maharashtra Revenue Minister Madan Bafna dies
शासकीय कार्यालयात मंत्र्यांचा, पंतप्रधानांचा फोटो लावता येतो का? काय आहेत नियम?

गेल्या काही काळापासून मदन बाफना हे आजारी होते. दीर्घ आजाराशी झुंज देत असताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर राजकीय नेते, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केलाय. मावळच्या राजकीय वाटचालीला दिशा देणाऱ्या या ज्येष्ठ नेतृत्वाच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालीय.

Former Maharashtra Revenue Minister Madan Bafna dies
पक्ष बदलणाऱ्या खासदार- आमदारांना चाप बसणार; पक्षांतर रोखण्यासाठी कपिल सिब्बलांनी सुचवला 'मास्टरप्लॅन'

मदन बाफना यांनी मावळच्या राजकारणात प्रदीर्घ काळ सक्रिय भूमिका बजावली होती. आमदार म्हणून काम करताना त्यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडली. त्यानंतर मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळत आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. १९६७ मध्ये एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वकिलीबरोबरच सार्वजनिक जीवनात प्रवेश केला.

Former Maharashtra Revenue Minister Madan Bafna dies
मोठी बातमी! आता बंडखोर खासदारांच्या गटातच फूट? 17 जणांनी निवडला वेगळा मार्ग

पुण्यात शिक्षण घेत असताना त्यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी मैत्री झाली. त्यानंतर ही मैत्री राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दीर्घ सहकार्यामध्ये रूपांतरित झाली. बाफना यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्थानिक पातळीवरून केली. त्यांनी मावळ तालुका काँग्रेस कमिटी तसेच पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती. १९७७ मध्ये पुणे जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले.

मावळचे दोनदा आमदार, दोनदा मंत्री

मावळ विधानसभा मतदारसंघातून त्यांनी १९८५ आणि १९९० मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला. अशाप्रकारे त्यांनी मावळचे दोनदा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. आमदारकीच्या काळात त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. महसूल राज्यमंत्री तसेच परिवहन राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले.

सर्वसामान्य नागरिकांशी असलेला त्यांचा जिव्हाळा आणि कार्यकर्त्यांशी असलेले जवळचे संबंध ही त्यांच्या राजकीय प्रवासाची महत्त्वाची वैशिष्ट्ये मानली जात होती. राजकारणात अनेक चढ-उतार आले, मात्र मावळच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये त्यांचा प्रभाव कायम राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com