

NCPIमध्ये गेलेल्या टीएमसीच्या बंडखोर खासदारांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांनी १७ खासदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला आहे.
श्चिम बंगालच्या लोकसभा खासदार सायनी घोष यांच्यासह काही खासदार नाराज असल्याचे वृत्त समोर आले आहे.
'नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया' (NCPI) मध्ये फूट पडल्याच्या बातम्या आता समोर येत आहेत. तृणमूल काँग्रेसमध्ये बंड करून बाहेर पडलेल्या खासदरांचा गटात फूट पडलीय. काही महिन्यांपूर्वीच २० TMC खासदारांनी एनसीपीआयमध्ये प्रवेश केला होता. आता बंडखोर खासदारांच्या गटात फूट पडली असून यामध्ये पश्चिम बंगालच्या लोकसभा खासदार सायनी घोष यांचाही समावेश आहे
कूचबिहारचे लोकसभा खासदार आणि तृणमूल काँग्रेसचे बंडखोर नेते जगदीश चंद्र बर्मा बसुनिया हेही नाराज आहेत. जगदीश चंद्र बर्मा यांनी सांगितले की, ऑक्टोबरमधील दुर्गापूजेपूर्वी किंवा त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) २० पैकी १७ खासदार भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील होणार आहेत.बसुनिया यांनी पत्रकारांना सांगितले की, १७ खासदारांनी एकत्रितपणे भाजपमध्ये सामील होण्याची प्लॅन केलाय. यासह सामूहिकरीत्या पक्षबदल केल्यामुळे ते पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेत येणार नसल्याचा दावा त्यांनी केलाय.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये मोठे बंड झाले होते. १४ जून रोजी नाराज २० जणांनी तृणमूल नेत्यांनी 'नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया' (NCPI) मध्ये विलीनीकरणाची घोषणा केली होती. त्यानंतर सत्ताधारी 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'ला म्हणजे (NDA) आपला पाठिंबा जाहीर केला. अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी या २० बंडखोर खासदारांपैकी किमान १४ जणांनी एकजुटीने भाजपमध्ये जाणं आवश्यक आहे, जेणेकरून 'दोन-तृतीयंश' संख्येचा निकष पूर्ण करता येईल.
बसुनिया यांनी सांगितले की, अल्पसंख्याक समुदायातील या २० खासदारांपैकी तिघेजण भाजपमध्ये अधिकृतपणे सामील होणार नाहीत, कारण त्यांच्या मतदारसंघांमधील राजकीय आणि प्रशासकीय परिस्थिती अशा निर्णयासाठी अनुकूल नाहीये. खासदार अबू ताहर खान, खलीलुर रहमान आणि युसूफ पठाण हे एनडीएला बाहेरून पाठिंबा देतील. त्यांना महत्त्वाची जबाबदारी किंवा खाती दिली जाऊ शकतात, असा दावाही जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.