नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. अभिजीत दीपके मागच्या काही दिवसांपासून शिक्षणमंत्र्यांच्या भाजप सरकार विरोधात जोरदार आंदोलन करत आहे. त्यासाठी त्यांनी देशातील वेगवेगळ्या शहरात देखील आंदोलन केली. आता शिवसेना ( ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्वाची घोषणा करत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. मी एका विषयासाठी आलो आहे. लोक बोलत नाहीत. जंतरमंतरवर दीपकेने जो विषय उचलला तो अनेक युवकांच्या भवितव्याचा विषय आहे. नीटचे पेपर फुटले. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. कोणी लक्ष दिले. सरकारला वेळ नाही. खासदार फोडाफोडीकडे त्यांचे लक्ष आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
विद्यार्थ्यांचे नशीब फुटले आहे. सोनम वांगचूक आणि दीपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. अशी मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. वांगचूक भेटून गेले. त्यांच्या बुद्धिमतेचा वापर केला पाहिजे. मागच्या 16 दिवसांपासून ते आमरण उपोषण करत आहेत. चार दिवसापूर्वी अरविंद सावंत त्यांना भेटायला गेले होते. मी त्यांच्याशी फोनवरून बोललो. आंदोलन करू नका. तुमची गरज आहे, असे म्हटले. पण सरकारला त्यांची गरज नाही. एक एक व्यक्ति गेला तर सरकारला ते पाहिजेच आहे. असे नाईलाजाने म्हणावे लागतय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सोनम वांगचूक यांची यांची प्रकृती खालवत चालली आहे. एक क्षण आला आहे, सर्व जणांनी सर्व विषय घेण्याची आवश्यकता नाही. पण एखाद्या विषयावर देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे असे म्हणतोय. पक्षाचे झेंडे घेऊन जावे असे म्हणत नाही. दीपके देशातील युवकांचा आवाज उठवत आहे. हे शिकलेले युवक आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.