भाजपच्या दिग्गज नेत्याच्या एकुलत्या एक मुलाचे भुसावळमध्ये अपघाती निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

BJP Leader Son Dies In Bhusawal Road Accident Maharashtra: भुसावळ येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात भाजप नेते संतोष चंद यांचे एकुलते एक चिरंजीव रितेश चंद यांचा मृत्यू झाला. या घटनेने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
Ritesh Chand, son of BJP leader Santosh Chand, who died in a tragic road accident in Bhusawal.
Ritesh Chand, son of BJP leader Santosh Chand, who died in a tragic road accident in Bhusawal.saam tv
Published On

उत्तरप्रदेश: नर्रे गावातील 26 वर्षीय रितेश चंद यांचा महाराष्ट्रातील भुसावळ येथे शुक्रवारी झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला. रितेश् हे भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष चंद यांचे एकुलते एक चिरंजीव होते. त्यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. रितेश भुसावळ हे एका खासगी कंपनीमध्ये कार्यरत होते. शुक्रवारी झालेल्या या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. नातेवाईक आणि परिवारातील सदस्य तात्काळ भुसावळकडे रवाना झाले.

Ritesh Chand, son of BJP leader Santosh Chand, who died in a tragic road accident in Bhusawal.
Crime: घरात घुसलेल्या चोरांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार, प्रायव्हेट पार्टवर हल्ला नंतर...

शनिवारी सायंकाळी कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह गावाकडे नेला. रविवारी सायंकाळपर्यंत मृतदेह गावात पोहोचणार असून त्यानच्यावर अंत्यसंसकार करण्यात येणार आहेत.रितेश हे आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबाचा एकमेव आधार हरपला आहे. गावात हळहळ व्यक्त केली जात असून मोठ्या संख्येने नागरिक शोकाकुल कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी भेट देत आहेत.

Ritesh Chand, son of BJP leader Santosh Chand, who died in a tragic road accident in Bhusawal.
माजलगाव तहसील कार्यालयासमोर भीषण अपघात; कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक, 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

रितेश यांच्या निधनाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवान, चिल्लूपारचे आमदार राजेश त्रिपाठी, बांसगावचे आमदार डॉ. विमलेश पासवान, भाजप जिल्हाध्यक्ष जनार्दन तिवारी, गगहा ब्लॉक प्रमुख शिवाजी चंद, मंडळ अध्यक्ष अजीत वर्मा, भाजप नेते राधामोहन सिंह, विनय शुक्ल, अरविंद पांडेय, राकेश सिंह, पंकज सिंह, मनोज सिंह, माजी जिल्हा महामंत्री सबल सिंह पालीवाल, संजय सिंह ‘गुड्डू’, अन्नू पांडेय, हरिओम सिंह, जितेंद्र शर्मा यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी,भाजप कार्यकर्ते आणि पत्रकारांनी शोक व्यक्त केला. सर्वांनी दिवंगत आत्म्यास शांती लाभो आणि शोकाकुल कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com