भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

Stone Pelting On BJP Leader : कान्हेरी रोडवर भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलंकर यांच्या वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केलाय. शेटफळेगडे येथील शेतकऱ्यांची बैठक संपवून सोलनकर घरी परतत होते. त्यावेळी पालखी महामार्गालगतच्या कान्हेरी रोडवर हा हल्ला झाला.

​विना नंबरप्लेटच्या दोन दुचाकींवरून आलेल्या अज्ञात इसमांनी सोलनकर यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली. हल्लेखोरांपैकी एकाच्या हातात कोयता असल्याचा दावा वैभव सोलनकर यांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फरार हल्लेखोरांचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com