Mumbai : घरातून कामासाठी बाहेर पडले... पण पुन्हा परतलेच नाहीत; पावसाने मुंबईत आणखी एका कुटुंबाचा आधार हिरावला

Mumbai News : मुंबईत मुसळधार पावसादरम्यान कुर्ला येथील नौपाडा परिसरात दुकानावर झाड कोसळून ६३ वर्षीय युनूस कुंडावाला यांचा मृत्यू झाला. झाड कोसळण्याच्या वाढत्या घटनांमुळे पालिकेच्या पूर्वतयारीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
MUMBAI TREE FALL TRAGEDY: 63-YEAR-OLD MAN DIES AFTER TREE COLLAPSES IN KURLA AMID HEAVY RAINS
MUMBAI TREE FALL TRAGEDY: 63-YEAR-OLD MAN DIES AFTER TREE COLLAPSES IN KURLA AMID HEAVY RAINSSaam Tv
Published On
Summary
  • कुर्ला येथील नौपाडा परिसरात दुकानावर झाड कोसळलं

  • झाड कोसळून ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

  • मुंबईत पावसाळ्यात झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ

  • पालिकेच्या पूर्वतयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे

राज्यात पावसाचा जोर वाढला असून पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहेत. मुंबईसह अनेक शहरांना अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान यंदाच्या पावसाळ्यात मुंबईतील झाडे कोसळण्याच्या घटना जास्त समोर येत आहेत. यावरून पावसाळ्यापूर्वी महापालिकेने कितपत कामे केलीत याचा अंदाज येत आहे. काही दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड पडल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अशातच आता अंगावर झाड पडल्याने ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कुर्ला येथील नौपाडा परिसरात महापालिकेच्या शाळेजवळ झाड पडून ही दुर्घटना घडली असल्याचं म्हटलं जात आहे. आता या दुर्घटनेची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळच्या सुमारास नौपाडा परिसरातील एका दुकानावर अचानक मोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत युनूस कुंडावाला (वय ६३) हे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि घटनेची माहिती महानगरपालिका, अग्निशमन दल तसेच पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच संबंधित यंत्रणांचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व बचावकार्य सुरू करण्यात आले.

MUMBAI TREE FALL TRAGEDY: 63-YEAR-OLD MAN DIES AFTER TREE COLLAPSES IN KURLA AMID HEAVY RAINS
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

जखमी अवस्थेतील युनूस कुंडावाला यांना तातडीने जवळील फौजिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, मुंबईत झाडे कोसळण्याच्या सलग घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.

MUMBAI TREE FALL TRAGEDY: 63-YEAR-OLD MAN DIES AFTER TREE COLLAPSES IN KURLA AMID HEAVY RAINS
Railway Booking : रेल्वेचा मोठा निर्णय! १५ मिनिटे आधीही बुक करता येणार कन्फर्म तिकीट; वाचा A to Z माहिती

त्यानंतर आज दादर परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने त्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे धोकादायक आणि जीर्ण झालेल्या झाडांचे सर्वेक्षण करून त्यांची योग्य वेळी छाटणी किंवा हटविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच, पावसाळ्याच्या काळात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महानगरपालिकेने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com