

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील प्रख्यात डॉक्टरचा मृत्यू
शेतामध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह
पॅथॉलॉजिस्ट डॉ. गोपाल सोनी यांच्या मृत्यूमुळे खळबळ
पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली
बुलडाण्याच्या खामगाव शहरातील प्रिसिद्ध डॉक्टरांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. शेतामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. डॉक्टरांच्या मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. खामगाव ग्रामीण पोलिसांनी या घटनेची नोंद करत तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ संशयितांची कसून चौकशी सुरू केली आहे. त्यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली या सर्व बाजूने पोलिस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात ही घटना घडली. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेव रक्तपेढी चालवणारे प्रख्यात डॉ.गोपाल सोनी यांचा रविवारी सायंकाळी त्यांच्या शेतात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेमुले जिल्हाभरात आणि वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. रविवार असल्याने डॉ. गोपाल सोनी हे एकटेच त्यांच्या शेतात गेले होते. त्यानंतर दीड ते दोन तासानंतर ते मृतावस्थेत शेतात आढळल्याने हा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबद्दल वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
डॉ. गोपाल सोनी हे खामगाव शहरातील प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट आणि सोनी रक्तपेढीचे संचालक होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते रुग्णांना चांगली सेवा देत असल्यामुळे जिल्हाभर त्यांचा चांगला परिचय होता. मात्र त्यांच्या अशा संशयास्पद मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रासह सर्वसामान्यांमध्ये संशयाचे वातावरण आहे. त्यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिस चौकशी करत आहेत. दरम्यान रात्री उशिरा खामगाव पोलिसांनी या प्रकरणी ३ जणांना ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी सुरू असून अशा प्राख्यात डॉक्टरांच्या संशयास्पद मृत्यूमुळे त्यांचा मृत्यू नैसर्गिक घातपात याविषयी खामगाव ग्रामीण पोलिस चौकशी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.