Buldhana : दुर्दैवी! पोहण्याचा मोह जीवावर बेतला, पाय घसरून खोल नदीत २ मुलं बुडाली

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे पूर्णा नदीत पोहताना दोन अल्पवयीन मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
TWO MINOR BOYS DROWN IN PURNA RIVER AT NANDURA IN BULDHANA DISTRICT
TWO MINOR BOYS DROWN IN PURNA RIVER AT NANDURA IN BULDHANA DISTRICTSaam Tv
Published On
Summary
  • बुलढाण्यातील दोन अल्पवयीन मित्रांचा पूर्णा नदीत बुडून मृत्यू

  • पोहताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही नदीत बुडाले

  • सरकारी रुग्णालयात तपासणीनंतर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले

बुलढाण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. नदीवर पोहण्याचा मोह दोन कोवळ्या जिवांच्या जीवावर बेतला आहे. नांदुरा शहरातील वार्ड क्रमांक १ मधील दोन अल्पवयीन मुलांचा पूर्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज सकाळी पोहण्यासाठी गेलेल्या या दोन चिमुरड्यांना खोल पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यांचा पाय घसरल्याने हा घात झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण नांदुरा शहरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातील वार्ड क्रमांक १ मध्ये राहणारा १४ वर्षांचा कृष्ण बाळू भोपळे आणि १२ वर्षांचा प्रतिक शिवलाल वानखेडे हे दोन्ही मित्र आज रविवारी सकाळी पूर्णा नदीच्या पात्रात गेले होते. मात्र, पाण्याचा पोहताना अंदाज न आल्याने आणि पाय घसरल्याने दोघेही खोल पाण्यात बुडू लागले. मुलांनी मदतीसाठी आरडाओरड केली, पण पाण्याचा प्रवाह आणि खोली जास्त असल्याने दोघेही नदीच्या पात्रात बेपत्ता झाले. मुले बुडाल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली.

TWO MINOR BOYS DROWN IN PURNA RIVER AT NANDURA IN BULDHANA DISTRICT
Health Care : महिनाभर केळी खाल्ली तर शरीवर काय परिणाम होतो?

घटनेची गांभीर्य ओळखून 'ओम साई फाउंडेशन'च्या जलमित्र पथकाने तातडीने नदीकडे धाव घेतली. पथकातील गोपाल फंड, उमेश पाखरे, विकास पाखरे, प्रद्युम्न पाखरे आणि राजू पाखरे यांनी जीवाची परवा न करता पूर्णा नदीच्या पात्रात उड्या घेतल्या आणि शोधमोहीम सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढण्यात आले आणि तातडीने नांदुरा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, नशिबाने आधीच घात केला होता.

TWO MINOR BOYS DROWN IN PURNA RIVER AT NANDURA IN BULDHANA DISTRICT
Snake : पावसाळ्यात सापांना 'ही' ६ झाडे आवडतात, कारण वाचून येईल चक्कर

डॉक्टरांनी तपासानंतर या दोन्ही चिमुरड्यांना मृत घोषित केले. पोहण्याचा हा थरार अनेकदा जीवघेणा ठरतो, हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जलमित्रांनी दाखवलेले तत्परता कौतुकास्पद असली, तरी दोन निष्पाप जिवांना वाचवण्यात अपयश आले. प्रशासनाकडून आणि आमच्या चॅनलकडूनही नागरिकांना आवाहन आहे की, नद्या किंवा धरणांच्या परिसरात आपल्या लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवा, जेणेकरून अशी दुर्दैवी घटना पुन्हा घडणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com