Alisha Khedekar
केळ हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर असून दिवसभराचा थकवा कमी होण्यास मदत होते.
केळ्यातील फायबर आतड्यांचे आरोग्य जपते, बद्धकोष्ठता कमी करते आणि पचनक्रिया अधिक सुरळीत ठेवण्यास मदत करते.
पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
नियमित केळ खाल्ल्याने स्नायूंचे कार्य सुधारते, तसेच व्यायामानंतरचा थकवा कमी होण्यास मदत होते.
केळ्यातील ट्रिप्टोफॅन शरीरात सेरोटोनिन तयार करण्यास मदत करते, त्यामुळे मन प्रसन्न आणि शांत राहू शकते.
केळ खाल्ल्यानंतर पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते, त्यामुळे अनावश्यक खाणे कमी होऊ शकते.
केळ्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य जपण्यास मदत करतात, त्यामुळे त्वचा अधिक चमकदार दिसू शकते.
हे केवळ माहितीसाठी आहे, साम टीव्ही असा कुठलाही दावा करत नाही