Uddhav Thackeray : अरे हxxxx आहेत ते! उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे? विधीमंडळ परिसरात बोलताना Audio रेकॉर्ड

Uddhav Thackeray Legislative Assembly Statement : यंदाच्या अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणावरुन पुन्हा गोंधळ सुरु झाला आहे. याआधी राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले होते.
Uddhav Thackeray says haramkhor while talking
Uddhav Thackeray says haramkhor while talkingSaam Tv News
Published On

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणावरून पुन्हा एकदा गदारोळ होताना दिसत आहे. त्याचदरम्यान, उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरेंची एन्ट्री झाली होती. त्यावेळी ते वरूण सरदेसाईंशी चर्चा करताना पुढे चालत होते. तेव्हा 'अरे हxxxx आहेत ते' असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता उद्धव ठाकरे कुणाला हरामखोर म्हणाले? त्यांचा रोख कोणाकडे होता? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

यंदाच्या अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणावरुन पुन्हा गोंधळ सुरु झाला आहे. याआधी राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले होते. त्यानंतर आज भाजपचे आमदार राम कदम यांनी माध्यमांशी बोलताना अनेक आरोप केले आहेत. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा पुन्हा तपास करावा अशी मागणी त्यांनी केली. सुशांतसिंह राजपूत मृत्यू झाल्यानंतर त्याच्या घराची रातोरात रंगरंगोटी कुणी केली असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच या प्रकरणी बिहारचे पोलीस तपासासाठी मुंबईत आल्यानंतर त्यांना सहकार्य न करता माघारी का पाठवलं? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.

Uddhav Thackeray says haramkhor while talking
Kolhapur News : कुणाचा जीव गेला असता तर! मुलांना शालेय पोषणातून त्रास, संतप्त पालकांचा शाळा प्रशासनावर आरोप

दिशा सालियन प्रकरणावरून गोंधळ होत असताना उद्धव ठाकरे विधीमंडळाच्या परिसरात आले. त्यावेळी सभागृहात जात असताना त्यांनी आमदार वरुण सरदेसाई यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 'अरे हxxxx आहेत ते' असं वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य हे माध्यमांच्या कॅमेरांमध्ये आणि ऑडिओमध्ये कैद झालं. दरम्यान, त्यांनी हे वक्तव्य कोणाला उद्देशून केलं? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

Uddhav Thackeray says haramkhor while talking
Pune News : ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी…; ठाकरे गटाने शिंदे गटाला डिवचलं, पुण्यात बॅनरबाजी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com