Kolhapur News : कुणाचा जीव गेला असता तर! मुलांना शालेय पोषणातून त्रास, संतप्त पालकांचा शाळा प्रशासनावर आरोप

Kolhapur Panhala Taluka School Nutrition : पन्हाळा तालुक्यातील माळवाडी येथील विद्यामंदिर माळवाडी या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींनी शालेय पोषण आहार खाल्ला. काही वेळाने त्यांना त्रास सुरु झाला.
Panhala Malwadi Primary School School Nutrition
Panhala Malwadi Primary School School NutritionSaam Tv News
Published On

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील माळवाडी येथील प्राथमिक शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलींना शालेय पोषण आहार खाल्ल्यानंतर अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तात्काळ कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. ही माहिती समजताच पालकांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं .

पन्हाळा तालुक्यातील माळवाडी येथील विद्यामंदिर माळवाडी या प्राथमिक शाळेत इयत्ता सहावी-सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलींनी आज सकाळी शालेय पोषण आहार खाल्ला.काही वेळाने सहा मुलींना अचानक जुलाब व उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे त्यांना कोतोली येथील प्राथमिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पालक आरोग्य केंद्रात आले तेव्हा शिक्षकांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. मुलांना शिळे जेवण का देता? करपलेला भात का देता?शिजलेल्या भातामध्ये आळ्या सापडतात, टोके सापडतात मग तुम्ही करता काय? असा आरोपही पालकांनी यावेळी केला. शालेय पोषण आहार व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आल्याचं आता सांगण्यात आलं आहे.

Panhala Malwadi Primary School School Nutrition
Pune News : ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी…; ठाकरे गटाने शिंदे गटाला डिवचलं, पुण्यात बॅनरबाजी

अंगणवाडीतील पोषण आहारात अळ्या

दरम्यान, असाच काहीसा प्रकार फ्रेब्रुवारी महिन्यामध्ये नवी मुंबईतील कळंबोलीतून समोर आला होता. अंगणवाडीमधील बालकांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात चक्क अळ्या निघाल्याची धक्कादायक घटना कळंबोली वसाहतीत मधील अंगणवाडी क्रमांक ५५ मध्ये घडली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधीत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकारामुळे बालकांच्या आरोग्यालाही धोका असल्याचं स्पष्ट झालं होतं.

अंगणवाडी क्रमांक ५५ या ठिकाणी नेहमीप्रमाणे बालकांना पोषण आहारात रव्यापासून तयार करण्यात आलेल्या उपीटचं वाटप करण्यात आलं होतं. या वेळी काही बालकांनी आहार खाल्ला तर काही बालकांनी आहार घरी नेला. शालेय पोषण आहार घरी नेल्यानंतर अंगणवाडीतील एका बालिकेच्या आहारात अळ्या असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले होते.

Panhala Malwadi Primary School School Nutrition
Saurabh Rajput Case : मुस्कान झुठी है! मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थंड डोक्याने रचला प्लान; पण एका चुकीने खेळ खल्लास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com