Bee attack in Akola : रोडगे पार्टीदरम्यान घडली भयंकर घटना; मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू

Akola Latest News : अकोल्यात रोडगे पार्टीदरम्यान भयंकर घटना घडली आहे. अकोल्यात मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. वाचा रोडगे पार्टीदरम्यान नेमकं काय घडलं? वाचा
akola Shocking News
akola Shocking Saam tv
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोल्यात रोडगे पार्टी महिलेच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. अकोल्यातील रोडगे जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान मधमाशांचं मोहोळ उठलं. त्यानंतर मधमाशांनी पार्टीतील लोकांवर हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर इतर जण जखमी झाले आहेत. अकोल्याीतल काजकेश्वरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने हसत्या खेळत्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.

अकोल्यातील रोडगेच्या जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अनेक महिला जखमी झाल्या आहेत. अकोल्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील काजकेश्वरमध्ये शेतात रोडगे जेवणासाठी मोठ्या उत्साहात स्वयंपाक सुरू असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला.

akola Shocking News
Akola News : कुटुंब जेवत असताना तब्बल ३५ रानडुक्कर घरात घुसले, शेतकऱ्याने शक्कल लढवली; अन्...

अकोल्यात पार्टीदरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. रेश्मा आतिश पवार असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रकाश पांडुरंग पवार यांच्या शेतात आयोजित रोडगे जेवणाच्या कार्यक्रमात अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. तर मीरा राठोड आणि दोन लहान मुलांसह काही अन्य लोक जखमी झाले आहेत.

akola Shocking News
Akola News : अकोल्यात दगडफेक आणि वाहनाची जाळपोळ; दोन गटात तुफान राडा, एकाची प्रकृती चिंताजनक

नेमकं काय घडलं?

आज सोमवारी दूपारपासून रोडगे पार्टीसाठी तयारी सुरू होती. रोडगेसाठी गवऱ्या पेटवून रोडगे बनवण्याचे काम सुरू झाले. मात्र, याच गवऱ्याच्या धुरामुळे जवळील मधमाशांचे पोळे फुटले आणि मधमाशांनी लोकांवर अचानक हल्ला केला.परंतु मधमाशांच्या हल्ल्यात रेश्मा पवार यांचा जागीच दुर्देवी झाला. तर जखमींवर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर देखील मधमाशांनी शिवभक्तांवर हल्ला केला होता. मधमाशांच्या हल्ल्यात काही शिवभक्त जखमी झाले होते. मधमाशांच्या हल्ल्यानंतर शिवभक्तांवर तातडीने उपचार करण्यात आले.

akola Shocking News
Akola Police : क्रिकेट बेटींगचे साहित्य पुरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ३३ जण पोलिसांच्या ताब्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com