Honey Bee Attack : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचं मोहोळ उठलं, शिवभक्तांवर हल्ला, १० जखमी

Honey Bee Attack at shivneri fort : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांनी शिवभक्तांवर हल्ला केला. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात १० शिवभक्त जखमी झाले. या घटनेनंतर किल्ल्यावर एकच खळबळ उडाली.
Honey Bee Attack in shivneri
Honey Bee Attack Saam tv
Published On

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंत्तीनिमित्त किल्ले शिवनेरी किल्ल्यावर शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. जयंत्तीनिमित्त सकाळपासून शिवभक्तांची रेलचेल आहे. याच शिवभक्तांवर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात १० शिवभक्त जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

पुण्यातील किल्ले शिवनेरी गडावर वन कर्मचाऱ्यांसह शिवभक्तांवर मधमाशांचा अचानक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांच्या हल्ल्यात दोन वनविभागाचे कर्मचारी आणि १० शिवभक्त जखमी झाले आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने जखमींना उपचारासाठी दाखल केलं आहे.

किल्ले शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना मोठ्या संख्येने शिवभक्त दाखल झाले होते. त्यावेळी शिवनेरीच्या कडेलोट टोकावर पाहणी करत असताना मधमाशांनी शिवभक्तांवर हल्ला केला. हल्ल्यातील सर्वांची प्रकृती ठिक असल्याची माहिती हाती आली आहे .

Honey Bee Attack in shivneri
Shivneri Sundari : खुशखबर! एसटी बसमध्ये येणार विमानाचा फील; 'शिवनेरी सुंदरी' ठेवणार प्रवाशांची खास सोय

नेमकं काय घडलं?

शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हजारो शिवभक्त जमले होते. सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास काही शिवभक्त गडावरील कडेलोट पॉइंट येथे गेले. त्याचवेळी मधमाशांनी अचानक शिवभक्तांवर हल्ला केला. यात हल्ल्यात आठ ते दहा शिवभक्त जखमी झाले. त्यांच्यावर तातडीने गडावरील आरोग्य पथकाने प्राथमिक उपचार केले.

Honey Bee Attack in shivneri
Amol Kolhe Viral Photo | अमोल कोल्हे यांचा Shivneri किल्ल्यावरील फोटो तुफान व्हायरल | Marathi News

उपचार करायला गेलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही मधमाशांनी हल्ला केला. या प्रथमोपचार मिळाल्यामुळे शिवभक्तांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या शिवभक्तांवर जुन्नरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकारानंतर शिवनेरीवर भविष्यात असा प्रकार घडणार नाही, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना राबवाव्यात,अशी मागणी शिवभक्तांकडून केली जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पनवेलमधील कर्नाळा किल्ल्यावर मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात एका पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तर इतर पर्यटक गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com