Shivneri Sundari : खुशखबर! एसटी बसमध्ये येणार विमानाचा फील; 'शिवनेरी सुंदरी' ठेवणार प्रवाशांची खास सोय

Shivneri Sundari to welcome passengers : प्रवाशांची खास सोय ठेवण्यासाठी एसटी महामंडाळाने 'शिवनेरी सुंदरी' नेमण्याची घोषणा केली आहे.
Shivneri Sundari to welcome passengers
Shivneri Sundari to welcome passengersSaam TV
Published On

विमानात प्रवास करताना अनेकदा तुम्ही एअर होस्टेज बघितल्या असतील. प्रवाशांच्या सेवेसाठी त्यांची नियुक्ती केली जाते. प्रवासात कुठलीही अडचण असल्यास या हवाई सुंदरी सोडवण्याचा प्रयत्न करतात. आता अशाच हवाई सुंदरी तुम्हाला एसटी बसमध्ये देखील दिसणार आहे. प्रवाशांची खास सोय ठेवण्यासाठी एसटी महामंडाळाने 'शिवनेरी सुंदरी' नेमण्याची घोषणा केली आहे. एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांनी हा निर्णय घेतला आहे.

Shivneri Sundari to welcome passengers
Breaking News : पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून मदत जाहीर; महाराष्ट्राला मिळाले 1492 कोटी रुपये, गुजरातला किती?

मुंबईत मंगळवारी भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली ३०४ वी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर,‍ परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व एसटी महामंडचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच त्याला मान्यता देखील देण्यात आली. बैठकीतील सर्वांचे लक्ष वेधून घेणारा निर्णय म्हणजे एसटी महामंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यास मान्यता देण्यात आली.

त्यानुसार, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरीची नेमणूक करण्यात येणार आहे. असा उपक्रम सुरु करणारे महाराष्ट्र हे सध्यातरी देशातील पहिलेच राज्य आहे. शिवनेरी सुंदरीची नेमणूक केल्यानंतर प्रवाशांना प्रवासात निर्माण होणाऱ्या अडचणीतून मुक्तता होणार आहे.

विशेष बाब म्हणजे, शिवनेरी सुंदरीची नेमणूक केल्यानंतरही शिवनेरीच्या बस तिकीटात कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. दरम्यान, बैठकीत नवीन २५०० साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा तसेच १०० डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरीत करण्याचा विषयांना मान्यता देण्यात आली आहे.

Shivneri Sundari to welcome passengers
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोदींची महाराष्ट्र वारी, पहिल्यांदाच कार्यक्रमात दिसणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com