Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोदींची महाराष्ट्र वारी, पहिल्यांदाच कार्यक्रमात दिसणार

PM Modi Thane Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते अनेक विकासकामाचे उद्घाटन करणार आहेत. लाडकी बहीण योजना कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.
CM Eknath Shinde Mukhyamantri Ladki Bahin Yojana
CM Eknath Shinde Mukhyamantri Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

Ladki bahin yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) ५ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील महिला सक्षमीकरण अभियानाच्या 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना' (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पीटीआयने याबाबतचे वृत्त दिले आहे. लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी योजना आहे, पण आतापर्यंत पीएम मोदी यांनी याबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते, अथवा त्या कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. पण आता ठाण्यात होणाऱ्या लाडकी बहीण योजना काक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनाबद्दल बोलतील, असे म्हटले जातेय.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दिवसभरात ठाण्यातील अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला, ज्यात पावसाच्या प्रसंगी व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन तसेच पार्किंग लॉजिस्टिक यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबर रोजी ठाण्यात येणार आहेत. त्या निमित्ताने हा आढावा घेण्यात आला. पाच ऑक्टोबर रोजी ठाण्यातील वाहतुकीतही मोठा बदल करण्यात आलाय. जिल्हा प्रशासनामार्फत परिपत्रक काढत याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

CM Eknath Shinde Mukhyamantri Ladki Bahin Yojana
PM Modi Thane Visit : PM मोदींचा ठाणे दौरा, वाहतुकीत मोठा बदल; कोणते रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

लाडकी बहीण योजना नेमकी काय?

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे. कुटुंबाचं उत्पन्न २.५ लाख रुपयांच्या आतमध्ये असावे, अशी अट टाकण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम ठाण्यात कुठे होणार?

ठाणे शहरात कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान यांच्या या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक संपन्न झाली.

CM Eknath Shinde Mukhyamantri Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत? ही प्रोसेस केल्यास खात्यात लगेच जमा होतील!

पंतप्रधान मोदींच्या सभेची तयारी पूर्ण -

हवामान खात्याने वर्तविलेल्या पावसाची शक्यता लक्षात घेवून मुख्य सभामंडप, पार्किंग व्यवस्था येथील सर्व नियोजन करण्यात यावे. त्याचबरोबर वीज पुरवठा, इंटरनेट सेवा, आरोग्य सेवा यांची पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. तसेच, या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असल्याने ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी बंद होणारे रस्ते, सेवा रस्त्यांच्या वापराची स्थिती आदींबाबत नागरिकांना अवगत करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.

सुमारे 40 हजार नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमास अपेक्षित असून ठाणे तसेच ग्रामीण व महापालिकांमधून सुमारे 1200 बसगाड्यांची ये-जा घोडबंदर रोड परिसरात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नियोजित दौरा शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांचे नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार, पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ठाणे वालावलकर मैदान येथे बैठक झाली.

मुख्य सभामंडप, हेलिपॅड, गाड्या आणि बसेस पार्किंग व्यवस्था, वीज पुरवठा, सीसीटीव्ही नेटवर्क, जोड रस्ते यांच्या सद्य:स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com