Tomato Price
Tomato PriceSaam tv

Tomato Price: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; आवक वाढुनही विक्रमी बाजारभाव

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; आवक वाढुनही विक्रमी बाजारभाव
Published on

जुन्‍नर : कवडीमोल बाजारभाव, रोगराईमुळे टोमँटो उत्पादक शेतकरऱ्याला उत्पादन खर्च तर सोडाच मजुरीचा खर्चही मिळत नसल्याने (Farmer) शेतकरी पुरताच हतबल झाला होता. अशातच आज नारायणगाव बाजार समितीत (Bajar Samiti) टोमँटोची विक्रमी आवक होऊन २० किलो कँरेटला ५०० रुपयांचा बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. (Tajya Batmya)

Tomato Price
Kalyan Crime News: गोळीबार प्रकरणात वेगळे वळण; रिव्हॉल्व्हर चेक करताना झाला गोळीबार, ठेकेदारासह मुलगा व नोकरावर गुन्‍हा

मागच्या दोन महिन्यात टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत होता. यामुळे टोमॅटोचा शेतात लाल चिखल झाला. तर काही शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत नारायणगाव बाजार समितीत टोमॅटो फेकला होता. अर्थात शेतकऱ्याने टोमॅटो पिकाची लागवड केल्‍यापासून लावलेला खर्च देखील भाव नसल्‍याने निघत नव्‍हता. यामुळे टोमॅटो उत्‍पादक शेतकरी हताश झाला होता.

Tomato Price
Dhule News: लाखोंच्या गुटखा, पान मसाल्यासह दोघे पोलिसांच्‍या ताब्‍यात

टोमॅटोला रंग चढला

गेल्‍या काही महिन्‍यात टोमॅटोला अपेक्षीत असा भाव मिळाला नाही. मात्र आजपासुन नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोची आवकही वाढली असुन विक्रमी बाजारभाव मिळाल्याने टोमँटो उत्पादक शेतकऱ्यांना उभारी मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com