Kalyan Crime News: गोळीबार प्रकरणात वेगळे वळण; रिव्हॉल्व्हर चेक करताना झाला गोळीबार, ठेकेदारासह मुलगा व नोकरावर गुन्‍हा

गोळीबार प्रकरणात वेगळे वळण; रिव्हॉल्व्हर चेक करताना झाला गोळीबार, ठेकेदारासह मुलगा व नोकरावर गुन्‍हा
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam tv

अभिजित देशमुख

कल्‍याण : टिटवाळा ठेकेदारावर गोळीबार प्रकरणी पोलीस तपास सुरू असताना या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. (Kalyan) जखमी ठेकेदार उमेश साळुंखे व त्याचा मित्र शिंदे हे घराजवळील शेडमध्ये बसले होते. उमेश यांच्याजवळील रिव्हॉल्वर शिंदे यांनी घेतली. ही रिव्हॉल्व्हर तपासत (Police) असताना यामधील गोळी सुटून उमेश यांना लागली असल्‍याचे तपासात समोर आले आहे. (Latest Marathi News)

Kalyan Crime News
Sangli Corporation News: फाईलवर ठेवला जिवंत कोंबडा; नगरसेवकाचे अनोखे आंदोलन

कल्याणजवळ असलेल्या टिटवाळा (Titwala) परिसरात एका ठेकेदारावर गोळीबार झाल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. जखमी झालेल्या ठेकेदार उमेश साळुंखे याला उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला अज्ञात इसमानी गोळीबार केल्याचे सांगत पोलीस तपासात दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी सीसीटिव्ही तपासले असता यात धक्कादायक प्रकार समोर आला.

Kalyan Crime News
Tattoo Trend: टॅटू काढताय तर सावधान..आयुष्यभरासाठी टॅटू पडू शकतो महागात; सुईमुळे एचआयव्हीचा धोका?

घरात सापडला शस्‍त्रसाठा

रविवारी रात्रीच्या सुमारास ठेकेदार उमेश साळुंखे व त्याचा मित्र शिंदे नावाचा मित्र हे घराजवळ शेडमध्ये बसले असता रिव्हॉल्वर तपासत असताना रिव्हॉल्वरमधील गोळी सुटून उमेश साळुंखे यांना लागली. घडलेला प्रकार लपवण्यासाठी गोळीबार करण्यात आल्याची सांगत पोलिसांची दिशाभूल करण्यात आली. पोलिसांनी या घराची झडती घेतली असता घरामध्ये तीन रिव्हॉल्वर, तेरा काडतूस, आठ तलवारी, दोन चोपर हस्तगत करण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पाहून पोलीस देखील चक्रावले. याप्रकरणी जखमी उमेश साळुंखे, मुलगा शुंभम साळुंखे, नोकर राम सिंग, शिंदे नावाच्या इसमाविरोधात गुन्हा दाखल केला. हे तिन्ही रिव्हॉल्वर बेकायदेशीर आहेत. त्यांनी रिव्हॉल्वर कोठून आणले होते व कशासाठी आणले होते याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com