Sangli Corporation News
Sangli Corporation NewsSaam tv

Sangli Corporation News: फाईलवर ठेवला जिवंत कोंबडा; नगरसेवकाचे अनोखे आंदोलन

फाईलवर ठेवला जिवंत कोंबडा; नगरसेवकाचे अनोखे आंदोलन
Published on

सांगली : सांगली महापालिकेत राष्ट्रवादीचे (NCP) नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे फाईलवर कोंबडा आंदोलन केले. फाईलवर (sangli News) सहीसाठी अधिकाऱ्यांनी आयुक्तांचा कोंबडा मागितल्याचा आरोप केला आहे. यामुळेच नगरसेवक थोरात हे जिवंत कोंबडा घेऊन अधिकाऱ्याच्या भेटीला आले. (Breaking Marathi News)

Sangli Corporation News
Chalisgaon Crime News: नात्‍याला काळीमा..पत्‍नी आजारी असताना जन्‍मदात्‍या बापानेकडून नऊ वर्षीय मुलीवर अत्‍याचार

सांगली महापालिकेत आज राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आज लक्षवेधी आंदोलन चांगलेच चर्चेत आले. फाईलवर आयुक्तांचा कोंबडा म्हणजेच शेरा पाहिजे, असे लेखाधिकारी यांनी सांगितले. यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी चक्क जिवंत कोंबडा फाईलवर ठेवत अधिकाऱ्यांच्या शेऱ्याकडे लक्ष वेधले. यावेळी मनपा मुख्यालयासमोर योगेंद्र थोरात यांनी फाईलवर कोंबडा ठेवत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

Sangli Corporation News
Gutkha Seized In Nashik: १७ लाखांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त

लेखाधिकारीच्‍या दालनाबाहेरही आंदोलन

लेखा विभागात जाऊन लेखाधिकारी केंबले यांच्या केबिनसमोर सुद्धा प्रतीकात्मक कोंबडा आंदोलन केले. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस नगरसेवक तोफिक् शिकलगार उपस्थित होते. या लक्षवेधी आंदोलनाची सांगली महापालिकेत जोरदार चर्चा सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com