Akola Police : क्रिकेट बेटींगचे साहित्य पुरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ३३ जण पोलिसांच्या ताब्यात

Akola News : ग्राहकाकडून ऑनलाईन पैसे घेत त्यांची आयडी बनवुन पैसा प्रमाणे वेब आयडी बनवायचे. स‌ट्टा खेळवून जिंकलेल्या किंवा हरलेल्या पैशांची देवान-घेवान करत होते
Akola Police
Akola PoliceSaam tv
Published On

अक्षय शिंदे 

अकोला : अकोल्यात क्रिकेटवर ऑनलाईन स‌ट्ट्यासाठी लागणारे आयडी तयार करणाऱ्याला टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या टोळीला अकोला पोलिसांनी गजाआड केले आहे. क्रिकेटवर बेटींगसाठी लागणारे साहित्य पुरवणाऱ्या टोळीतील तब्बल ३३ जणांसह या टोळीचा प्रमुख सूत्रधार संजय गुप्ता आणि मोनीश गुप्ता हे देखील पोलिसांच्या अटकेत आहेत. 

अकोल्यातल्या येवता आणि कातखेड रस्त्यावरील एका गोदामात टोळी क्रिकेट खेळावर ऑनलाईन स‌ट्ट्यासाठी लागणारे आयडी तयार करीत होती. सदरची टोळी वेब अँपचा वापर करून क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कसिनो गेम, पेड ऑनलाईन गेम ईत्यादी खेळावर व्हाट्सअप, टेलीग्राम यासारख्या सोशल मिडीया ग्रुपवर जाहिरात करायची. तसेच ग्राहकाकडून ऑनलाईन पैसे घेत त्यांची आयडी बनवुन पैसा प्रमाणे वेब आयडी बनवायचे. स‌ट्टा खेळवून जिंकलेल्या किंवा हरलेल्या पैशांची देवान-घेवान करत होते. 

Akola Police
Karnataka Bus Accident : बस- ट्रक्टरचा अपघात; नियंत्रण सुटून बस ३० फूट खड्ड्यात कोसळली, २० प्रवासी जखमी

टोळीत वेगवेगळ्या राज्यातील सदस्य 

दरम्यान, टोळीने यासाठी ५४ बँकेचे खाते विविध बँकेत उघडले होते. अनेक दिवसांपासून अकोल्यात ही टोळी कार्यरत होती. अखेर आज अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीचा पर्दाफाश केला. दरम्यान, गुजरात राज्यातील ६, उत्तर प्रदेश येथील ३, बिहार आणि मध्य प्रदेश राज्यातील प्रत्येकी १ आणि महाराष्टातील चंद्रपूर, पूणे, मुंबई, अमरावती बुलढाणा येथील ८ आणि अकोला जिल्ह्यातील १४ असे हे आरोपी आहेत.

Akola Police
Washim News : टोलनाक्याचा दांडा तोडून सुसाट निघाला ट्रक; पोलिसांनी पाठलाग करत पकडले, समोर आला धक्कादायक प्रकार

लाखोंचा मुद्देमाल जप्त 

पोलिसांनी टोळीचा फर्दाफ़ाश करत टोळीतीळ ३३ लोकांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात त्यांच्याकडून एकुण १२ लॅपटॉप, ११३ मोबाईल, १० बँकेचे पासबुक, २ पासपोर्ट, १३ एटीएम कार्ड, १२ इन्टरनेट राउटर व मोडेम तसेच जुगार खेळण्यासाठी वापरलेली सर्व साहीत्य जप्त करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com