Washim News : टोलनाक्याचा दांडा तोडून सुसाट निघाला ट्रक; पोलिसांनी पाठलाग करत पकडले, समोर आला धक्कादायक प्रकार

Washim : पोलिसांनी मध्य प्रदेशचा क्रमांक असलेल्या या ट्रकला तपासणी करण्याकरता पोलीसानी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक टोल नाक्याचा दांडा तोडून कारंजा शहराकडे भरधाव वेगाने घेऊन मार्गस्थ झाला
Washim News
Washim NewsSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 
वाशीम
: मुक्या जनावरांची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. समृद्धी महामार्गावर नागपूरकडून येणाऱ्या वाशिमच्या कारंजा येथील टोल प्लाझावर हा प्रकार उघडकीस आला असून कारंजा पोलिसांमुळे ट्रकमध्ये कोंबून वाहतूक केल्या जाणाऱ्या २७ बैलांची सुटका करण्यात आली आहे. मात्र यात चार बैलांचा मृत्यू झाला आहे. 

समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकमध्ये ३१ बैल निर्दयतेने कोंबून वाहतूक केली जात होती. दरम्यान ट्रक कारंजा येथील टोल प्लाझावर आला असता पोलिसांनी मध्य प्रदेशचा क्रमांक असलेल्या या ट्रकला तपासणी करण्याकरता पोलीसानी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र सदरचा ट्रक टोल नाक्याचा दांडा तोडून कारंजा शहराकडे भरधाव वेगाने घेऊन मार्गस्थ झाला. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. 

Washim News
Grapes Farming : द्राक्ष बागांना सन बर्निंगचा फटका; वाढत्या तापमानाचा परिणाम

पाठलाग करत पकडला ट्रक 

कारंजा पोलिसांनी त्याचा पाठलाग करत काही अंतरावर जाऊन ट्रक पुढे थांबवून तपासणी केली. त्यात ३१ बैल निर्दयतेने कोंबलेले दिसून आले. दरम्यान यात ४ बैल मृतावस्थेत आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला. यावेळी कारंजा पोलिसांनी संशयित आरोपीकडून १० लाख रुपये किमतीचा ट्रक आणि ४ लाख ६५ हजार किमतीचे बैल असा एकूण १४ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Washim News
Karnataka Bus Accident : बस- ट्रक्टरचा अपघात; नियंत्रण सुटून बस ३० फूट खड्ड्यात कोसळली, २० प्रवासी जखमी

२७ बैलांना दिले पांझरापोळ संस्थेच्या ताब्यात 
दरम्यान या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गजानन कळणाजी पत्रे यांच्या फिर्यादीवरून आरोपी आयुब अली कुदरत अली (रा. मोती नगर  नवीन जेल रोड भोपाल मध्य प्रदेश) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर ट्रकमधील बैलांना ताब्यात घेऊन कारंजा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून २७ जिवंत बैलांचे मेडिकल व चार मृत जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले. जिवंत २७ बैलांना सुरक्षित स्थळी ठेवण्याकरिता पांजरपोळ गोरक्षण संस्था पलाना येथे रामकृष्ण भोलाराम ठाकूर यांच्या ताब्यात देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com