Akola News : १०वीचा पेपर सुरु असताना रील्स बनवलं, Video व्हायरल, रिल्सच्या अखेरीस..; अकोल्यातील संतापनजक प्रकार

Akola 10th Board Exam Reels Shoot : दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना जीवाला कलटणी देणारी अतिशय महत्त्वाची परीक्षा असते. परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी यंत्रणा विविध उपाययोजना करतात.
School Reels made while the paper
School Reels made while the paper SaamTV
Published On

अक्षय गवळी, साम टिव्ही

अकोला : अकोल्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात चक्क दहावीच्या सेंटरवर व्हिडीओ काढत रिल्स बनवण्यात आलंय. अकोल्यातल्या अग्रेसन चौकातल्या सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या विद्यालयातील हा व्हिडिओ आहे. थेट दहावीच्या परीक्षा केंद्रावरच हे रिल्स बनवण्यात आल्यानं परिक्षा केंद्रावरील सुरक्षेचा बोजवारा उडालाय. या विद्यार्थ्याचा शोध घेणे सुरू असल्याचं समजत आहे, आणि त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना जीवाला कलटणी देणारी अतिशय महत्त्वाची परीक्षा असते. परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी यंत्रणा विविध उपाययोजना करतात. तरी देखील परीक्षा केंद्र परिसरात आणि परीक्षा देत असलेल्या वर्गातून व्हिडिओ काढून चक्क इंन्स्टाग्रामवर व्हायरल केला आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा केंद्र परिसरामध्ये १६३ कलम लागू असल्यानंतर या विद्यार्थ्याने मोबाईल आतमध्ये नेला कसा? आणि त्याने व्हिडिओ काढला कसा? हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. हा सर्व प्रकार आहे अकोला शहरातल्या अग्रेसर चौकातील सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या विद्यालयामधील.

School Reels made while the paper
Maharashtra Politics : नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक, निवासस्थानाबाहेर गोऱ्हेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन

या सेंटरवर दहावीची परीक्षा सुरू आहे तर २१ फेब्रुवारीला दहावीची परीक्षा सुरू झाली, आणि पहिलाच पेपरच्या दिवशी एका विद्यार्थ्याने चक्क परिसरामध्ये मोबाईल नेऊन परिसर शूट केला. हा विद्यार्थी तेवढ्यावरच थांबला नाही. तर परीक्षा सुरू असलेल्या वर्गातही मोबाईल घेऊन गेला आणि परीक्षा सुरू असतानाचा व्हिडिओ त्याने मोबाईल मध्ये शूट केला. त्यानंतर तो व्हिडिओ चक्क त्याने त्याच्या sameer_vlogs_253 या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला.

हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्यामुळे परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बोथ चालू ठेवण्यास निबंध आहेत. त्यासोबत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, इत्यादी वस्तू घेऊन जाण्यावर बंदी असतानाही या विद्यार्थ्याने मोबाईल आतमध्ये नेला कसा आणि video रेकॉर्डिंग करताना कोणी का पाहिले नाही? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या रिल्सच्या अखेरीस काही विद्यार्थी पेपर सोडत असल्याचे दिसून येत आहे. अकोल्याच्या या परीक्षा केंद्रावरील रील शूट प्रकरणी आता यंत्रणा काय कारवाई करते? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

School Reels made while the paper
Car Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ओव्हरटेक करताना चालकाला डुलकी; बॅरिकेटला धडकून कार उलटली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com