Car Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ओव्हरटेक करताना चालकाला डुलकी; बॅरिकेटला धडकून कार उलटली

Wardha Accident: समृद्धी महामार्गवरील येळाकेळी येथील एका कारला भीषण अपघात झालाय. यात दोन जणांचा मृत्यू झालाय.
Car Accident
Wardha Accidentsaam tv
Published On

चेतन व्यास, साम प्रतिनिधी

प्रयगराज येथून कुंभ स्नान करून निघालेल्या भाविकांच्या वाहनाला समृद्धी महामार्गवरील येळाकेळी परिसरात अपघात झालाय. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. येळाकेली परिसरात ओव्हरटेक करत असताना कार चालकाला डुलकी आली त्यामुळे कारवरील ताबा सुटला. स्टेअरिंगवरील ताबा सुटल्यामुळे कार थेट बॅरिकेटला धडकली त्यानंतर उलटी झाली. हाती आलेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व प्रवासी हे शिर्डी येथे जाते होते.

मिळालेल्या माहितीनुसार,बेंगळुरूच्या कुडलो येथील रहिवासी नरेश व्यंकटेश (वय 35) हे आपल्या कार क्रमांक केए 51 एमएक्स 8761 ने प्रयागराज ते नागपूर मार्गे शिर्डी जात होता. यावेळी नरेशसोबत त्याची पत्नी रमेश्री (32), बहिण शकुंतला (50), चालक नरेशचा मुलगा पूर्विक नरेश (6), मित्र संजय नाझंया (40) कारमध्ये सवार होते. समृद्धी महामार्गवरून कार वर्ध्यापासून जात होती.

Car Accident
MSRTC ST Bus Attack: बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली, ठाकरे गट आक्रमक

येलाकेली जवळ समोर जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना कार पलटी होत बॅरिकेटला धडकली. यात नरेश गंभीर जखमी झाला आणि अपघातात कारमधील रमेश्री आणि शकुंतला दोन्ही महिलांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चालकाची बहिण आणि पत्नी आहेत. तर संजय आणि पूर्विक जखमी झाले. जखमींचं प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहचली. सोबतच सावंगी मेघे पोलीस स्टेशनची टीम सुद्धा दाखल झाली आहे. महामार्ग पोलिसांनी सीआरओ मुंबई, नागपूर यांना अपघाताची माहिती दिली. महामार्ग पोलीसचे पीएसआय दिलीप थाटे आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या मदतीने कारला रस्त्यापासून दूर करून वाहतूक सुरळीत केली.

जळगावात दुचाकींची समोरासमोर धडक

एरंडोल रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झालीय. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर पतीसह लहान मुलगी आणि दुसऱ्या दुचाकीवरील आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झालेत. यातील जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com