वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू; महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भयानक घटना

Tiger Attack On Women Collecting Tendu Leaves In Chandrapur Forest: चंद्रपूर जिल्ह्यातील सिदेंवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांवर वाघाने हल्ला करून त्यांचा मृत्यू झाला.
Four women killed after a sudden tiger attack in Gunjewahi forest area of Chandrapur district, Maharashtra.
Four women killed after a sudden tiger attack in Gunjewahi forest area of Chandrapur district, Maharashtra.Saam Tv
Published On

संजय तुमराम, साम टीव्ही

चंद्रपूर जिल्हयातील सिदेंवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात भीषण आणि तितकीच मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या चार महिलांवर वाघाने अचानक हल्ला करून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Four women killed after a sudden tiger attack in Gunjewahi forest area of Chandrapur district, Maharashtra.
Sanjay Raut On Modi | इंदापुरातील मेळाव्यातून राऊतांचा भाजप- मोदींवर हल्लाबोल! | Marathi News

मिळालेल्या माहितीनुसार, या महिला सकाळच्या सुमारास लगतच्या जंगलात तेंदू पाने गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्या सर्व महिला एकाच ठिकाणी जवळपास काम करत असतानाच अचानक जंगलातून आलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

Four women killed after a sudden tiger attack in Gunjewahi forest area of Chandrapur district, Maharashtra.
Maharashtra Accident: महाराष्ट्राचे धक्कादायक वास्तव! दररोज ४४ जणांचा अपघाती मृत्यू, या ५ जिल्ह्यात सर्वाधिक अपघात; आकडे वाचून थक्क व्हाल

ठार झालेल्या महिलांची नावे

कवडूबाई दादाजी मोहुर्ले- वय 45

अनुबाई दादाजी मोहुर्ले- वय 46

संगीता संतोष चौधरी- वय 36

सुनीता कौशिक मोहुर्ले- वय33

सदर घटनेमुळे मोहुर्ले आणि चौधरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com