Children health in summer: पुढील 5 दिवस मुलांसाठी धोकादायक! नवतपामुळे देशभर उष्णतेचा कहर वाढणार

India heatwave: देशभरात नवतपाला सुरुवात झाली असून २ जूनपर्यंत तीव्र उष्णतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील ब्रह्मपुरीत ४७.२ अंश तापमानाची नोंद झाली. मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Children health in summer
Children health in summersaam tv
Published On

पालकांनो पुढील 5 दिवस हे तुमच्या मुलांसाठी अत्यंत धोकादायक असणार आहेत. देशात आजपासून नवतपाला सुरुवात झालीये. 2 जूनपर्यंत कडक उन्हाचा इशारा देण्यात आलाय. सूर्य रोहिणी नक्षत्रात आल्यामुळे या 9 दिवसांत पृथ्वी भट्टीसारखी तापणार आहे.रात्रीच्या वेळीही नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागेल. या काळात मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे

देशभरात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मे महिन्याच्या अखेरीसही उन्हाचा तडाखा कमी होण्याची चिन्हं नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रविवारी अनेक राज्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला असून महाराष्ट्रातील विदर्भ विभाग अक्षरशः तापला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भातील ब्रह्मपुरी हे रविवारी देशातील सर्वात उष्ण ठिकाण ठरलंय. याठिकाणी तब्बल 47.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

Children health in summer
Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

दिल्लीतही वाढला पारा

राजधानी दिल्लीतही तापमानाचा पारा चांगलाच वाढला. रविवारी दिल्लीतील कमाल तापमान 43.6 अंश सेल्सियस नोंदवण्यात आलं, जे हंगामाच्या सरासरीपेक्षा 3.4 अंशांनी जास्त होतं. अयानगर आणि रिज परिसरात 44.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर लोधी रोडमध्ये 43.8 अंश, पालममध्ये 43.7 अंश आणि सफदरजंगमध्ये 43.6 अंश सेल्सियस तापमान राहिलं होतं.

ब्रह्मपुरी ठरलं सर्वाधिक उष्ण ठिकाण

महाराष्ट्रातील विदर्भ भागात उष्णतेची तीव्रता सर्वाधिक पाहायला मिळाली. ब्रह्मपुरीमध्ये तापमान 47.2 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं जे सरासरीपेक्षा 4.6 अंशांनी अधिक होते. त्यामुळे ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक उष्ण ठिकाण ठरलंय. विदर्भातील इतर अनेक शहरांमध्येही तापमान 45 अंशांच्या पुढे गेलंय.

Children health in summer
Brain cancer symptoms: अचानक ही ६ लक्षणं दिसली तर समजा ब्रेनच्या कॅन्सरचा आहे धोका

चंद्रपूरमध्ये 45.6 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेलं. वर्ध्यामध्ये 45.5 अंश, नागपूरमध्ये 45.4 अंश, अमरावतीमध्ये 45.2 अंश तर गोंदियामध्ये 45 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

Children health in summer
Thyroid disorder: सतत बेचैनी आणि हृदयाची धडधड वाढतेय? डॉक्टरांनी सांगितली थायरॉईडच्या कॅन्सरची धोकादायक लक्षणं

आजपासून नवतापाला सुरुवात

२०२६ मध्ये नवताप २५ मे ते २ जून दरम्यान आहे. ज्यावेळी सूर्य ज्येष्ठ महिन्यात रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा नौतप सुरू होतो, जो नऊ दिवसांचा तीव्र उष्णतेचा काळ असतो. या काळात, सूर्याची किरणं थेट पृथ्वीवर पडतात ज्यामुळे पृथ्वी एखाद्या कढई किंवा भट्टीप्रमाणे तापते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com